कामाची गोष्ट ! ‘आधार’कार्ड वरील नाव, जन्मतारीख आणि पत्ता बदलायचाय तर मग ‘ही’ कागदपत्र ‘मस्ट’चं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आता प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे कागदपत्र झाले आहे. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता किंवा जन्म तारीख चुकली असेल किंवा तुम्ही पत्ता बदलला असेल तर तो अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी UIDAI ने आधार अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची यादी शेअर केली आहे. ज्यात 103 कागदपत्रांचा समावेश आहे. या आधारे तुम्ही कागदपत्र अपडेट करु शकता.

नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्र
शिधापत्रिका, पीडीएस फोटो कार्ड, मतदान ओळख पत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन परवाना सरकारी फोटो असलेले ओळखपत्र ही कागदपत्र महत्वाची आहेत याशिवाय किसान फोटो पासबूक, CGHS / ECHS फोटो कार्ड, एनआरआयजीएस जॉब कार्ड, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेचे ओळखपत्र, शस्त्र परवाना, स्वातंत्र्य सैनिक फोटो कार्ड, राजपत्रित जाहीर केलेल्या फोटोसह ओळखीच्या प्रमाणपत्राचे लेटरहेड, ग्रामपंचायतीचे ओळख पत्र, दिव्यांग ओळखपत्र, खासदारांद्वारे देण्यात आलेले ओळखीचे प्रमाणपत्र, नाव बदलल्याची अधिसूचना असलेले गॅझेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, RSBY कार्ड, बँक पासबूक, शाळा सोडल्याचा दाखला.

जन्मतारीख चूकली असल्यास आवश्यक कागदपत्रे
माध्यमिक, उच्च माध्यमिक बोर्डाचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, एसएसएलसी बुक / सर्टिफिकेट, पासपोर्ट, पॅन कार्ड.

पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्र
शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, पोस्ट ऑफिसच्या अकाउंटचे स्टेटमेंट किंवा पासबुक, वाहन परवाना, वीज बिल, पाणी, वीज बिल तसेच विमा पॉलिसी, NREGS जॉब कार्ड, पेन्शनर कार्ड, स्वातंत्र्यसैनिक कार्ड, किसान पासबुक, CGHS / ECHS कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, पती-पत्नीचा पासपोर्ट, लहान मुले असतील तर आई वडिलांचा पासपोर्ट, शाळेचे ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.

जर आधार हरवले तर
जर तुमचे आधार कार्ड हरवेल असेल तर जरी नोंदणी क्रमांकाच्या आधारे UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन आधार कार्डची प्रिंट घेता येईल. ईआयडीच्याच मदतीने तुम्ही नवीन आधार कार्ड मिळवू शकता. आधारच्या एनरोलमेंट पावतीवरील 14-14 आकड्यांच्या आधारे तुम्हाला आधार कार्ड मिळेल.