नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण आपला नवीन ईमेल आयडी बनविला असेल किंवा बदलला असेल. तर तो बँकेशी लिंक करणे गरजेचे आहे. यासंबंधित प्रक्रिया खूप सोपी आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ग्राहक त्यांच्या बचत खात्यासह त्यांचा ईमेल आयडी सहजतेने बदलू किंवा अपडेट करू शकतात. हे ऑनलाइन किंवा मोबाइल ॲपद्वारे किंवा एसबीआय बँक शाखेत भेट देऊन करता येईल.
यात ऑनलाईन पद्धतीने अपडेट करताना :
– Www.onlinesbi.com वर लॉग इन करा.
– ‘प्रोफाइल – वैयक्तिक तपशील – ईमेल आयडी बदला’ वर क्लिक करा.
– स्क्रीनच्या डाव्या पॅनेलवर असणाऱ्या ‘माय अकाउंट’वर क्लिक करा.
– पुढील पेजवर खाते क्रमांक निवडा, ईमेल आयडी इनपुट करा आणि सबमिट क्लिक करा.
– आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठविलेला ओटीपी वापरुन ईमेल पत्ता बदलण्यास मान्यता द्या.
मोबाइल अॅपद्वारे ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी :
– एसबीआय मोबाइल अॅपवर लॉग इन करा.
– मेन्यू टॅब वरुन ‘माय प्रोफाइल’ वर जा आणि एडिट आयकॉनवर क्लिक करा.
– कृपया ईमेल आयडी प्रविष्ट करा.
– आता ओटीपी जनरेट करा आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
– आता सबमिट वर क्लिक करा.
आपण शाखेत जाऊन हे देखील करू शकता. यासाठी कोणत्याही एसबीआय शाखेत जाऊन विनंती पत्र भरून आणि सबमिट करा. आवश्यक पडताळणीनंतर शाखेकडून अपडेशन केले जाईल. आपल्याला आपल्या अपडेट ईमेल आयडीवर एक एसएमएस मिळेल.