‘आधार’साठी दिलेला मोबाइल नंबर विसरलात !; तर, नवीन मोबाईल नंबर अपडेटसाठी अवलंबा ‘ही’ पद्धत

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : आधार कार्ड हे सर्व सरकारी सुविधा मिळविण्यासाठी सर्वांना उपयोगी पडतंय. त्यामुळे ‘आधार’ पाहिजेच. देशातील बर्‍याच सरकारी योजनांची सुविधा मिळण्यासाठी आणि आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आपल्याकडे आधार असला पाहिजे, जो तुमच्या मोबाइल क्रमांकाशी जोडला जावा. यामागचे कारण असे आहे की, जेव्हा आपल्याला आपल्या आधार क्रमांकाच्या मदतीने काही काम करायचे असेल तर त्याच्या पडताळणीसाठी ओटीपी येतो. तो आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर येत असतो.

समजा, जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल किंवा बंद पडला असेल तर आधार मान्य करण्यासाठी येणारा ओटीपी तुमच्या जुन्या क्रमांकावर येईल किंवा येणार नाही. अशा परिस्थितीत आपण ओटीपी पडताळणीसह प्रक्रिया पूर्ण करू इच्छित असाल तर आपण तसे करण्यास सक्षम राहणार नाही. आपणास ‘एमआधार अ‍ॅप’ वापरायचा असेल तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे हि बंधनकारक आहे.

जाणून घ्या,‘आधार’मध्ये नवीन नंबर अपडेट कसा करायचा :
प्रथम आधार नोंदणी केंद्रावर जावे.
तेेथून फोन नंबर लिंक करण्यासाठी एक फॉर्म घ्यावा. त्याला आधार दुरुस्ती फॉर्म असे म्हणतात.
त्या फॉर्ममध्ये माहिती योग्य भरावी.
भरलेले फॉर्म संबंधित अधिकार्‍यास 25 रुपये फीसह जमा करावा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. या पावतीत क्रमांक असेल.
या मिळालेल्या नव्या क्रमांकाद्वारे आपण नवीन फोन नंबर आपल्या आधारशी जोडला गेला आहे की नाही हे तपासू शकता.
आपला आधार तीन महिन्यांत नवीन मोबाइल नंबरशी लिंक केला जाईल.
जेव्हा तुमचा आधार नवीन मोबाइल नंबरशी लिंक होईल, तेव्हा ओटीपी तुमच्या नव्या क्रमांकावर येईल.
आपण त्या ओटीपीचा वापर करून आपले आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकतो.
तसेच यूआयडीएआयच्या टोल फ्री नंबर 1 1947 1947 1947 वर कॉल करून आधारमधून नवीन मोबाईल नंबरला लिंक करण्याची स्थिती देखील आपणास जाणून घेऊ शकतो.

असा करा पीव्हीसी कार्डसाठी अर्ज
यूआयडीएआयने पीव्हीसी कार्डसह आधार कार्ड देणे सुरू केले आहे. कोणताही आधार कार्डधारक ते 50 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकतो. यासाठी प्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर (https://uidai.gov.in) जावे. त्यानंतर माझा आधार विभागातील ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करावे. ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करताच आपल्याला 12-अंकी आधार क्रमांक किंवा 16-अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28-अंकी ईआयडी प्रविष्ट करावा, या तिन्हीपैकी एक प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर आपणाला पीव्हीसी कार्ड मिळेल.