Howdy Modi : भारतीय वंशाचा ‘हा’ मुलगा कार्यक्रमापुर्वी गाणार ‘जन गण मन’, आवाज ऐकून प्रेमात पडाल (व्हिडीओ)

ह्युस्टन (अमेरिका) : वृत्तसंस्था – सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे PM नरेंद्र मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात पोहोचले आहेत, तेथे ते हाउडी मोदी सोहळ्यास संबोधित करतील. अमेरिकेतील ४८ राज्यांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांसह या सोहळ्यात ५० हजाराहून अधिक लोक उपस्थित असतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे खासदार आणि महापौरही या समारंभाला हजेरी लावणार आहेत. परंतू हा सोहळा आणखी एका व्यक्तीमुळे चर्चेत आहे. तो म्हणजे स्पेशल ‘स्पर्श शाह’. अत्यंत दुर्मिळ आजाराशी झुंज देणारा भारतीय वंशाचा हा एक १६ वर्षीय किशोर रविवारी ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत गाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उत्साहित असल्याचे त्याने सांगितले.

नेहमीच व्हीलचेअरमध्ये असणार्‍या स्पर्श शाहने आपली प्रकृती आपल्या सर्जनशीलतेच्या आड येऊ दिली नाही. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहणारा शहा रॅपर, गायक, गीतकार आणि प्रेरणादायी वक्ता आहे. त्याला जन्मतःच एस्टिओजेनेसिस इम्परपेक्टा हा रोग झाला होता. या रोगात, हाडे खूपच कमकुवत असतात आणि सहजरित्या मोडतात.

मिळालेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षात शहाच्या शरीरातील १३० हून अधिक हाडे मोडली आहेत. शहाचे स्वप्न पुढील एमिनेम व्हायचे आहे आणि एक अब्ज लोकांसमोर सादरीकरण करण्याची त्याला इच्छा आहे.

याबद्दल स्पर्श यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘इतके लोकांसमोर राष्ट्रगीत गाणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत गायला मला आनंद आहे. मी मोदीजींना प्रथम मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पाहिले, मला त्यांना भेटायचे होते, परंतु त्यावेळी मी त्यांना फक्त टीव्हीवरच पाहू शकलो. ते पुढे म्हणाले, “पण देवाच्या कृपेने, मी त्यांना भेटेन, आणि मी राष्ट्रगीत गायलाही उत्साही आहे.”

एमिनेमच्या ‘नॉट अफरेड’ या गाण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा शाहने सर्वप्रथम लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि चर्चेत आला. हा व्हिडिओ तब्बल ६.५ कोटीहून अधिक वेळा ऑनलाइन पाहिल्या गेला आहे. ‘स्पर्श शहा’च्या जीवनावर आधारित एक माहितीपट’ ब्रिटल बोन रॅपर ‘देखील जारी करण्यात आला आहे जो मार्च २०१८ मध्ये प्रसिद्ध झाला होता. राष्ट्रगीत गाण्याबरोबरच आणि ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी शहा उत्सुक आहेत.

Visit :- policenama.com