Hrithik Roshan | अभिनेता हृतिक रोशनी घेतल्या आहेत ‘या’ अभिनेत्याकडून बॉडी बिल्डिंगच्या टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये (Bollywood) हॅडसम लूक, परफेक्ट बॉडी, उत्तम अभिनय आणि सर्वोत्तम डान्स असे सर्वगुणसंपन्न कोण असेल तर तो अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आहे. बॉलीवुडमधील एक सुपरस्टार असलेला हृतिक (Hrithik Roshan) अनेकासांठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या डान्स मुव्ह आणि जबरदस्त बॉडी अनेकांना घायाळ करते. पण पहिला चित्रपट करताना मात्र त्यांच्याकडे बॉडी नव्हती. ती मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न त्याने केले मात्र तरीही रिजल्ट नसल्याने त्याने त्यावेळेच्या एका सुपरस्टार कडून टीप्स घेतल्या होत्या.

अभिनेता हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai) या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले. त्याची बॉलीवुडमधील एन्ट्री जबरदस्त असून हा सिनेमा त्याचे वडिल राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी काढला होता. हा हृतिकचा पहिला सिनेमा असल्याने त्याने चांगले दिसण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. या चित्रपटामध्ये हृतिकला दुहेरी भूमिका पार पाडायची होती. त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले मात्र तो यशस्वी होत नव्हता. अखेर त्याने बॉलीवुडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) कॉल लावला. आणि बॉडी ब्लिडिंगच्या टीप्स घेतल्या असा खुलासा स्वत: हृतिक रोशनने केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीमध्ये हृतिक रोशनने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी आणि त्यासाठी
केलेली मेहनत सांगितली. तो म्हणाला की, ‘मला माहित होते की माझे शरीर चित्रपटासाठी खूप महत्त्वाचे आहे.
विशेषत: या चित्रपटासाठी, मी पहिल्या भागात रोहित आणि दुसऱ्या भागात राज अशा दोन भूमिका करत होतो.
मला वाटले की दोन पात्रांमधील फरक मी शारीरिकदृष्ट्या देखील दाखवला पहिजे म्हणून,
मी एक वर्ष प्रशिक्षण घेत राहिलो, परंतु मला जेवढे परिणाम अपेक्षित होते ते दिसले नाहीत.

हृतिकने पुढे सांगितले की, ‘माझ्यातर्फे जेवढे काही करता येईल ते केले,पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी मी तेव्हाचा सर्वात मोठा स्टार, सलमान खान, जो मला अजिबात ओळखत नव्हता, त्याला कॉल केला.
मी तेव्हा स्वतःला विचारले की इंडस्ट्रीमध्ये कोणाचे शरीर सर्वोत्तम आहे आणि माझ्या मनात पहिले नाव आले
ते म्हणजे सलमान खान. मी त्याला कॉल केला आणि विचारले की तू इतकी चांगली बॉडी कशी बनवली आहेस,
त्यावर त्याने मला मार्गदर्शन केले. आणि काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्या माझ्या खरोखरचं कामी आल्या.

त्यानंतर हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आपल्या अभिनयाने व कौशल्याने मिळवलेली प्रसिद्धी ही तर पाहतच आहोत.

Web Title : Hrithik Roshan | hrithik flaunted his six pack body because of salman in kaho na pyaar hai the actor himself said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | सरकारी हॉस्पीटलमधील डॉक्टरची ओळख असल्याचे सांगुन PhonePe व्दारे घेतली लाच; सापळा कारवाई दरम्यान ‘कॅश’ घेताना रंगेहाथ पकडले

Pune ACB Case | अ‍ॅन्टी करप्शनची पथके पुण्यातील ‘त्या’ 2 पोलिसांच्या मागावर

Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)