Hukmichand Chordia Passess Away | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक, ‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hukmichand Chordia Passess Away | पुण्यातील प्रवीण मसालेवाले (Pravin Masalewale) या सुप्रसिद्ध ब्रँडचे संस्थापक, ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (Hukmichand Chordia Passess Away) यांचं आज 3 जून रोजी सकाळी वृद्धापकाळानं निधन (Died) झालं आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानं उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.

 

हुकमीचंद चोरडिया (Hukmichand Chordia Passess Away) यांनी 1962 साली त्यांनी प्रवीण मसालेवाले या कंपनीची स्थापना केली. आपलं भोजनाचं ताट स्वादिष्ट करणारं अत्यंत विश्वासार्ह नाव म्हणून प्रवीण मसालेवाले या मसाला कंपनीची ओळख झाली आहे. आपले मसालेवाले ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी 40 – 50 वर्ष अविरत मेहनत घेतली. विविध प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून तयार केले जातात. याला खास महाराष्ट्रीय तडका असतो. शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून तयार केले जातात. प्रत्येक माणसाच्या तोंडात प्रवीण मसालेवाले नाव बसलं आहे.

 

दरम्यान, आज त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikuntha Cemetery in Pune) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Hukmichand Chordia Passess Away | pravin masalewale hukamichand chordia businessman passed away in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा