HUL Price Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! ‘साबण’, ‘सर्फ’सह ‘या’ वस्तू झाल्या महाग, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  HUL Price Hike | वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे हैराण केले आहे. रोजच्या वापरातील वस्तूंचे भाव सतत वाढत चालले आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, दूध, ब्रेड महागल्यानंतर आता साबण, डिटर्जंट सुद्धा महागले आहे. देशातील मोठी एफएमसीजी कंपनी एचयूएल (HUL) ने व्हील पावडरचे दर 3.5 टक्केपर्यंत वाढवले आहेत. याशिवाय लक्स साबणाच्या किमतीत सुद्धा 8 ते 12 टक्केपर्यंतची वाढ केली आहे. म्हणजे आता ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा जोरदार (HUL Price Hike) फटका बसणार आहे.

अब की बार महंगाई की मार!
आता डिटर्जंट, साबणचे दर 14 टक्केपर्यंत वाढले आहेत. इंधन महागल्याने कंपन्यांचा खर्च वाढला आहे. लक्स साबण ब्रिटिश कंपनी यूनिलीव्हरची सहायक कंपनी हिदुस्तान युनिलिव्हरचा एक लोकप्रिय ब्रँड आहे. लक्स साबण, कंपनीच्या त्या लोकप्रिय प्रॉडक्टपैकी एक आहे जे भारतात जवळपास प्रत्यक घरात वापरले जाते.

इतक्या वाढल्या किमती

1. व्हील पावडरचा दर 3.5 टक्के वाढला आहे. म्हणजे अर्धा किलो (500 गॅ.) व्हीलच्या पॅकचा दर 1-2 रुपयांनी वाढेल.

2.  सर्फ एक्सल (Surf Excel Easy wash Variant) 1 किलोग्रॅमच्या पॅकेटचा दर 100 रुपयांनी वाढून 114 रुपये होईल.

3. रिन (Rin) च्या 1 किलोग्रॅम पॅकेटाचा दर 77 रुपयांवरून वाढून 82 रुपये होईल. अर्धा किलोग्रॅम (500 ग्रॅ) चा दर 37 रुपयांवरून वाढून 40 रुपये होईल.

4.  लक्स साबण (Lux Soap) चा दर 12 टक्केपर्यंत वाढेल.

5. लाईफ बॉय साबण (lifebuoy Sabun) चा दर 8 टक्केपर्यंत वाढेल.

 

इतर कंपन्यासुद्धा वाढवू शकतात दर

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इतर एफएमसीजी कंपन्या सुद्धा आपल्या प्रॉडक्टचे दर वाढवू शकतात. इंधनाचे वाढलेले दर आणि पाम ऑईलचे दर सतत वाढत असल्याने इतर कंपन्या सुद्धा आपले दर वाढवू शकतात.

 

Web Title : HUL Price Hike | hindustan unilever hikes prices of detergents soaps surf excel rin lifebuoy to now cost more know here new rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये मिळतो FD पेक्षा जास्त ‘रिटर्न’, 5 वर्षात जमा होईल मोठा फंड; जाणून घ्या

Rajesh Tope | महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले…

Cholesterol Control Drink | कोलेस्ट्रॉल कमी करणारे ‘हे’ 8 लाभदायक ड्रिंक्स, हार्ट अटॅकचा धोका करतील कमी; जाणून घ्या