Cholesterol Control Drink | कोलेस्ट्रॉल कमी करणारे ‘हे’ 8 लाभदायक ड्रिंक्स, हार्ट अटॅकचा धोका करतील कमी; जाणून घ्या

नवी दिल्ली : Cholesterol Control Drink | कोलेस्ट्रॉल, लीव्हरमधून तयार होणारा एक मेणासारखा पदार्थ आहे. हा शरीरात रक्त तसेच पेशींमध्ये असतो. शरीरात सेल्स, टिशू आणि अवयवांसह हार्मोन, व्हिटॅमिन डी आणि बाईल ज्यूसच्या निर्मितीत कोलेस्ट्रॉल महत्वाची भूमिका निभावतो. शरीरात एचडीएल (HDL) नावाचे गुड कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल (LDL) आणि ग्लिसराईड नावाचे बॅड कोलेस्ट्रॉल असतात. एलडीएलचा वाढलेला स्तर धमन्यांमध्ये फॅट तयार होण्याचे कारण बनू शकतो. यामुळे हृदयात रक्तप्रवाह कमी होऊ लागतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी कोणते ड्रिंक प्यावेत (Cholesterol Control Drink) जाणून घेवूयात…

 

हे आहेत कोलेस्ट्रॉल कमी करणारे 8 ड्रिंक्स (Cholesterol Control Drink)

1. ग्रीन टी – green tea

ग्रीन टी प्यायल्याने एलडीएलचा स्तर कमी होण्यास मदत होते. याशिवाय, ब्लॅक टीमध्ये ग्रीन टीच्या तुलनेत कमी कॅटेचिन असते.

2. टोमॅटोचा ज्यूस – Tomato Juice

दोन महिन्यापर्यंत रोज 280 मिलीलीटर टोमॅटो ज्यूस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारतो.

3. सोया मिल्क – Soy Milk

सोया मिल्क सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते.

4. ओट मिल्क – oat milk

ओट मिल्क कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात उपयोगी आहे.

5. बेरीज – Berries

बेरीज अँटीऑक्सिडेंटचा रिच सोर्स आहे. कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. यासाठी लो फॅट मिल्कसह बेरीजचा शेक बनवून प्या.

6. कोकोआ – Cocoa

कोकोआमधील फ्लेवनॉल नावाचे अँटीऑक्सीडेंट शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करते.

7. अल्कोहल – Alcohol

दारूचे सेवन योग्य प्रमाणात केल्याने रक्तात एचडीएलचा स्तर वाढवता येऊ शकतो. रेड वाईनमध्ये अ‍ॅटीऑक्सीडेंट गुण असल्याने ती योग्य प्रमाणात सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करता येऊ शकतो. रेड वाईन काही हृदयरोगांना रोखण्यात मदत करू शकते. मात्र जास्त प्रमाण झाल्यास बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतात. एका महिलेने रोज 1 ड्रिंक आणि पुरुषाने रोज 2 ड्रिंक पिण्याचा सल्ला दिला जातो.

8. स्टॅनोल आणि स्टेरॉल्सयुक्त ड्रिंक – Stanol and sterol drinks

स्टेरॉल्स आणि स्टॅनोल कोलेस्ट्रॉलच्या आकाराचे समान प्लांट केमिकल असतात, जे कोलेस्ट्रॉलचे अ‍ॅब्जॉर्पशन रोखतात. फूड कंपन्या हे केमिकल्स अनेक फूड प्रॉडक्ट्स आणि ड्रिंकमध्ये मिसळते.

Web Title : Cholesterol Control Drink | cholesterol control drink 9 drinks that lowers the risk of high cholesterol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update