… येथे स्वत:च्या बायकोसाठीच शोधले जातात ग्राहक

दिल्ली : वृत्तसंस्था –  जगात अशा काही अनेक गोष्टी आहेत किंवा परंपरा आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही ठिकाणी बळजबरीने सक्ती करून कोणतेही काम करून घेतले जाते. तर महिलांकडून त्यांचे आधीकार हिसकावून घेतले जातात आणि त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेतले जाते. अशाच एका परंपरेविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण, हे सर्व दुसऱ्या तिसऱ्या देशात नाही तर चक्क भारताच्या राजधानीत घडत आहे. दिल्ली येथे राहणाऱ्या पारणा समाजाच्या समुदायातील लोक देहविक्रीचा व्यवसाय करतात. हा त्यांचा पारंपारीक व्यवसाय आहे. दिल्ली एनसीआरच्या नजफगढ, प्रेमनगर आणि धर्मशाळा या गावात मुलीचा जन्म झाल्यास जोरदार उत्सव साजरा केला जातो. जोपर्यंत मुली नाबालीक आहेत  तोपर्यंत तिचे आई-वडिल तिला परपुरूषांना विकतात त्यानंतर तिचे लग्न होते लग्नझाल्यानंतर तिच्या कमाईवर तिच्या नवऱ्याचा आधीकार असतो. या भागात अशी अनेक घरे आहेत या ठिकाणी नवरा स्वतःच आपल्या बायकोसाठी ग्राहक शोधतो.
मुलींना या ठिकाणी जास्त शिक्षण घेण्याचा आधीकार नाही. तारूण्यात येताच त्यांना हैवानांच्या स्वाधीन केले जाते. ज्या मुली जाण्यास विरोध करतात त्यांना अतिशय त्रास दिला जातो. या समुदायातील एका महिलेने सांगितले की, त्यांना रोज कमीत-कमी पाच ते सात पूरुषांसोबत संबंध बनवावेच लागतात. कधी कधी पोलीस कारवाई करतात, पकडून नेतात त्यावेळी जाचातून सुटल्यासारखे वाटते पण ते देखील तेच करतात आणि आम्हाला सोडून देतात.