home page top 1

दोन बायकांच्या दादल्यावर FIR दाखल

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – पहिले लग्न झाले असताना देखील पुन्हा दुसरे लग्न करून फसवणूक करणाऱ्या पतीवर दुसऱ्या पत्नीने पोलिसांत धाव घेत पतीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दुसरे लग्न करून पत्नीची फसवणुक करणाऱ्या मोरेश्वर भाकरे (रा. कृष्णापूर, चांदूरबाजार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोरेश्वर भाकरे याचे काही वर्षापूर्वी लग्न झाले आहे. दरम्यान, त्याची ओळख अमरावतीमध्ये राहणाऱ्या एका विधवा महिलेसोबत झाली. मोरेश्वरने त्या महिलेला विश्वास घेवून आपले पहिले लग्न झाल्याचे सांगून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे सांगितले. महिलेने ही त्याच्यावर विश्वास दाखवला. या दोघांनी एका मंदिरामध्ये जाऊन लग्न केले. लग्नानंतर त्या महिलेने पहिल्या लग्नात तिला मिळालेले सर्व दागिने विश्वासाने मोरेश्वर याच्याकडे ठेवण्यासाठी दिले.

मोरेश्वर भाकरे याने दुसऱ्या पत्नीचे दागिने विकून त्याच्यावर मौजमजा केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मोरेश्वर याच्यावर पत्नीचा शारिरीक छळ, विश्वासघात, मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like