डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात ‘जबरा’ फॅन ; वाढदिवसानिमित्त उभारला ‘पुतळा’, घातला ‘दुग्धाभिषेक’

हैद्राबाद : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते फक्त अमेरिकेतच सापडणार नाहीत तर भारतात देखील डोनाल्ड ट्रम्प यांचे जबरी चाहते पहायला मिळत आहेत. असाच एक भन्नाट चाहता तेलंगणा राज्यात दिसून आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हा चाहता फक्त डोनाल्ड ट्रम्प यांची ६ फूट उंचीची मूर्ती उभारूनच थांबला नाही तर त्यांच्या मूर्तीला त्याने दुधाचा अभिषेक देखील घातला आहे.

ट्रम्प यांच्या वाढदिवशी उभारली मूर्ती

तेलंगणा राज्यातील जनगावचे रहिवासी असणाऱ्या  बुसा कृष्णा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा ६ फूट उंचीचा पुतळा उभारला आहे. कृष्णा यांनी १४ जून म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुतळा उभारला आहे. एवढेच नाही तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक देखील केला आहे. कृष्णा सांगतात की, मी दररोज डोनाल्ड ट्रम्प यांच्या मूर्तीची पूजा करणार आहे.

ट्रम्प मोठे धाडसी नेते

कृष्णा म्हणतात की, ट्रम्प खूप धाडसी नेते आहेत. आपल्या देशाच्या भल्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. दुसऱ्या देशातील नेत्याच्या विचारामुळे कोणत्यातरी देशाने स्वतःला त्रास करून घेण्याची काही गरज नाही. विरोध होणे ही लोकशाहीतील साधारण गोष्ट आहे.

ट्रम्प यांचे भक्त कृष्णा म्हणतात की, अमेरिकेने आणि भारताने त्यांच्यातील संबंध अजून मजबूत केले पाहिजेत. माझी इच्छा आहे की जगामध्ये भारत आणि अमेरिकेची मैत्री एक आदर्श उदाहरण बनेल. तोपर्यंत कृष्णा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भेटण्याची वाट पाहत आहेत. मी ट्रम्प यांच्याशिवाय अमेरिकेतल्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. नरेंद्र मोदी यांच्याविषयी कृष्णा यांना विचारल्यास त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

सिनेजगत

‘या’ ४ दिग्गज कलारांच्या शरिरात ‘ही’ कमरता, कधीही नाही आले लक्ष्यात कोणाच्या

‘हे’ आहेत बॉलिवूडमधील ‘५’ साऊथ रिमेक सिनेमे, आता ‘कबीर सिंह’

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

‘योग’ साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय

You might also like