Hyundai Motor India IPO | LIC पेक्षा मोठा IPO आणतेय ‘ही’ कंपनी, मारुती, महिंद्रा आणि टाटा मोटर्सचा मार्केट शेयर खाण्याची तयारी

नवी दिल्ली : Hyundai Motor India IPO | साऊथ कोरियाची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी हुंदाई मोटार आता भारतीय शेयर बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. मनी कंट्रोलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडने आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. या पब्लिक इश्यूमधून कंपनी २५,००० कोटी रुपये जमविण्याच्या तयारीत आहे.

आतापर्यंत सर्वात मोठा आयपीओ आणण्याचा रेकॉर्ड एलआयसीच्या नावावर आहे, जो २१,००८ कोटी रुपये होता. हुंदाईचा आयपीओ देशात कोणत्याही ऑटो कंपनीचा असा इश्यू असेल जो २१ वर्षानंतर येत आहे. यापूर्वी मारुती सुझुकीने २००३ मध्ये आयपीओ आणला होता.

हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड आयपीओद्वारे सुमारे १७% भागीदारी विकण्याचा विचार करत आहे. कंपनी या आयपीओमधून २५,००० कोटी रुपये (सुमारे ३ अरब डॉलर) जमवणार आहे. अशाप्रकारे कंपनीचे व्हॅल्यूएशन सुमारे १८ अरब डॉलर म्हणजे १.५ लाख कोटी रुपये होईल.

मारुतीनंतर हुंदाईने विकल्या सर्वात जास्त कार
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पॅसेंजर व्हेकल्सच्या विक्रीच्या बाबतीत हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड, मारुती सुझुकीनंतर भारतातील दूसरी सर्वात मोठी कार निर्माता आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या शेयरची कीमत मागील ६ महिन्यात २४.३५ टक्के वाढली आहे. मार्केट लीडर मारुतीचे मार्केट कॅप जवळपास ४,००,००० कोटी रुपये अथवा ४८ बिलियन डॉलर आहे.

ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या एक्सपर्टनुसार, हुंदाईच्या भारतीय युनिटने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६०,००० कोटी रुपयांचा रेव्हेन्यू आणि ४,६५३ कोटी रुपयांचा नफा मिळवला. हुंदाईच्या कारमध्ये i20, Verna, Creta, Aura, Tucson सारख्या काही भारतीय कारचा समावेश आहे.

देशात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओमध्ये एलआयसीशिवाय, पेटीएमची इश्यू साईज १८,३०० कोटी रुपये, कोल इंडियाची १५,१९९ कोटी रुपये आणि रिलायन्स पॉवरचा आयपीओ ११,५६३ कोटी रुपयांचा होता. अशाप्रकारे हुंदाईचा हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा पब्लिक इश्यू असेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP On Maharashtra Assembly Election | विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

Viman Nagar Pune Crime News | पुणे : विरोधकाला मदत करतो का? ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, सराईत गुन्हेगार गजाआड

New Platforms In Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकात नव्याने 4 प्लॅटफॉर्म उभारले जाणार; वाढती गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना