मी सुद्धा शहरी नक्षलवादी : पाटी गळ्यात अडकवल्याने गिरीश कर्नाड यांच्याविरोधात तक्रार

बंगळुरू : वृत्तसंस्था

पत्रकार आणि सामाजिक कार्यकऱ्या गौरी लंकेश यांच्या हत्येला ५ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. गौरी लंकेश यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या बंळुरूतील घराजवळ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अभिनेते, विचारवंत आणि लेखक गिरीश कर्नाड यांनी गळ्यात मी सुद्धा शहरी नक्षलवादी असे इंग्रजीत लिहिलेली पाटी गळ्यात अडकवली होती. यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेंगळुरू उच्च न्यायालयाच्या वकील एन. पी. अमृतेश यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार अ‍ॅड. एन. पी. अमृतेश यांनी म्हटले की, गिरीश कर्नाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी. कर्नाड यांनी मी सुद्धा शहरी नक्षलवादी अश आशयाची अशी पाटी गळ्यात अडकवून नक्षलवाद्यांच्या कारवायांचा आणि ते घडवत असलेल्या हिंसाचाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षलवादासंदर्भातली पाटी कोणी आपल्या गळ्यात घालूच कसे शकते? असा प्रश्नही अमृतेश यांनी उपस्थित केला आहे.

गौरी लंकेश यांच्या घराबाहेर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गिरीश कर्नाड यांच्यासह अनेक विवेवादी चळवळीतल्या लोकांचाही सहभाग होता. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून ज्या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे त्याविरोधातही या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. याचवेळी गिरीश कर्नाड ही पाटी गळ्यात अडकवली होती.

दिवाळीपूर्वी २० रुपयांची नवी नोट बाजारात येणार

[amazon_link asins=’B01MCUSD3L,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c72f2b31-b321-11e8-ab20-cf443f4da81a’]