याद राखा आम्ही पण पंजाबी आहोत ; कॅप्टन अमरेंद्र सिंग यांची पाकिस्तानला चेतावणी  

गुरुदासपूर : पंजाब वृत्तसंस्था – आमच्या देशात दहशतवादी पाठवून तुम्ही आमच्या देशाचे वातावरण बिघडवू नका अन्यथा तुम्हाला सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी दिला आहे. कर्तारपूर साहब कॉरिडॉरच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमात अमरेंद्र सिंग बोलत होते.

कॅप्टन अमरेंद्र सिंग यांनी  पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांना भर सभेतून एक सवाल केला तो सवाल असा कि, बाजवा यांनी सांगावे कि एक सैनिक दुसऱ्या सैनिकांना मारण्याचा आदेश कसा देऊ शकतो तुम्ही आमच्या देशात पठाणकोट आणि अमृतसर येथे दहशतवादी पाठवले तर याद राखा आम्ही पण पंजाबी आहोत सडेतोड उत्तर मिळेल अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. कर्तारपूर साहब कॉरिडॉरच्या उद्घाटनाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राज्यातील अन्य मंत्री उपस्थित होते.

काय आहे कर्तार साहब या ठिकाणचे महत्व
कर्तार साहब हे शीख धर्मियांचे पवित्र ठिकाण असून त्या ठिकाणी गुरुनानक देव  यांनी आपल्या आयुष्यातील १८ वर्ष  व्यतीत केले होते. म्हणून या ठिकाणी शीख धर्मीय हजेरी लावून येथील गुरुद्वाऱ्याचे दर्शन घेतात. भारत-पाकिस्तान सीमेच्या पार पाकिस्तानात चार किलोमीटर आत असलेल्या या ठिकाणी भारतीय आता जात नसून ते  भारत सीमेवर गुरुदासपूर  या ठिकाणीच या पवित्र धार्मिक स्थळाचे दर्शन घेतात.

प्रकाशसिंह बादल आणि सुखबीर बादल  यांच्या नावे झाकून टाकली. 
पंजाब सरकारचे मंत्री एस. एस रंधावा यांनी भूमिपूजन समारंभाच्या शिलालेखावर मुद्रित केलेली प्रकाशसिंह बादल आणि सुखबीर बादल यांची नावे फरशीच्या तुकड्याच्या सहाय्याने झाकली आहेत. त्यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले कि हा सरकारचा कार्यक्रम आहे अकाली दल अथवा भाजपचा कार्यक्रम नाही म्हणून ते उपस्थित नाहीत त्यांची नावे का तेथे ठेवायची असे रंधावा म्हणाले.