संसदेत पहिल्याच दिवशी रामदास आठवलेंनी विचारले, कुठे आहेत राहुल गांधी ? ; ‘ट्विट’ करत राहुल गांधी म्हणाले, मी..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता 17 व्या लोकसभेचे कामकाज सोमवार पासून सुरु झाले, पहिल्या दिवशी प्रोटेम स्पीकर (कार्यवाहक अध्यक्ष) वीरेंद्र कुमार यांनी पंतप्रधान मोदींना शपथ देत त्यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांना खासदार पदाची शपथ दिली. दरम्यान लोकसभा सदनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिसले नाहीत.

मोदींनी शपथ घेतल्यानंतर लगेचच मोदी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसकडे इशारा करुन विचारले की ‘कुठे आहेत राहुल गांधी?’ त्यानंतर राहुल गांधींनी ट्विट करत आपण कधी शपथ घेणार हे सांगितले.

राहुल गांधींची दुपारी खासदार म्हणून शपथ –

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण आज दुपारी लोकसभा खासदार म्हणून शपथ घेणार असल्याचे सांगितले. राहुल गांधीनी ट्विट केले की, लोकसभा सदस्याच्या रुपात माझा लागोपाठ 4 चा कार्यकाळ आज सुरु होणार आहे. केरळच्या वायनाडचा प्रतिनिधी म्हणून मी आज दुपारी खासदारकीच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. मी सर्वांना विश्वास देतो की, मी भारताच्या संविधाना प्रति विश्वास आणि निष्ठा राखेल. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता राहुल गांधी यांनी लोकसभेत पोहचून खासदारकीची शपथ घेतली.

याआधी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तब्बल 7 वेळा खासदार असलेले वीरेंद्र कुमार यांना लोकसभेच्या कार्यवाहकचे अध्यक्ष या रुपात शपथ दिली. बुधवारी लोकसभा अध्यक्षांच्या नियुक्ती नंतर त्यांची भूमिका समाप्त होईल. कुमार या आधी मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीत त्यांची भूमिका महत्वाची ठरेल. नव्या खासदारांसह लोकसभेचे हे पहिले सत्र 17 जून पासून 26 जुलैपर्यंत चालेल.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा