कमल हसन यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा 

चेन्नई : तमिळनाडू वृत्तसंस्था – अभिनेते कमल हसन यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले आहे. मक्कल निधी मय्यम’ (एमएनएम) या पक्षाची त्यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली होती. तर तामिळनाडू विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या २० जागा आपला पक्ष लढेल असेही कमल हसन यांनी जाहीर केले होते. आता त्यांनी त्यांच्या उमेदवारीची हि घोषणा केल्याने तमिळनाडूच्या राजकारणात चांगलीच हालचाल होणार आहे.

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशावरून कमल हसन यांनी हि आपण राजकीय पक्ष काढून प्रवेश करत आहोत असे जाहीर केले होते. तामिळनाडूच्या राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी पक्षाची कसून बांधणी केली जात असून कमलहसन यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे.  त्यांनी आपल्या राजकारणाचा दृष्टिक्षेप आणि विचारधारा धर्म निरपेक्ष ठेवली असून नटनट्यांच्या राजकारणाला भुलणारी दक्षिण भारतीय जनता आहे. याच पार्श्वभूमीचा फायदा घेण्याचा  प्रयत्न दोन्ही अभिनेत्यांनी चालवला आहे. रजनीकांत यांच्या राजकारणाला तोड देण्यासाठी दक्षिणेतील काही मुसद्दी राजकारण्यानी ठरवून कमल हसन यांना राजकारणात आणले आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. तसेच कमल हसन हे मुस्लिम असल्याने त्यांना मुस्लिम मतदारांची  एक गठ्ठा मत त्यांना मिळणार आहेत तर त्यांचे फॅन त्यांना निवडणुकीत विजयी करतील असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.

रजनीकांत यांच्या निवडणुकीची तयारी बघता कमल हसन यांनी सध्या तरी आघाडी घेतली आहेत असे म्हणण्यास वाव आहे. तर इकडे रजनीकांत यांच्या पक्षांची तयारी अद्याप तरी दिसून येत नाही. रजनीकांत यांच्या पक्षाचे राजकारण सध्या तरी दिसत नसले  तरी रजनीकांत निवडुकीच्या तोंडावर धमाका करतील असे बोलले वाजते आहे. तर कमल हसन यांनी सध्या तरी चांगली तयारी सुरू केली आहे. तर डीएमके आणि एडीएमके यांच्या  ही गोट्यात निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. या दोन अभिनेत्यांच्या तडाख्यातून वाचण्यासाठी या दोन्ही पक्षांना आपला कस लावावा लागणार आहे त्या साठी ते रणनीती आखत आहेत.