लग्नानंतर केवळ 15 दिवसातच पतीनं सोडलं, पुन्हा अशी IAS अधिकारी बनली मुलगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका स्त्रीचे जीवन आयुष्यभर आपल्या पतीच्या अवतीभवती तर फिरू शकत नाही. आपली स्वप्न पूर्ण करण्याचा तिलाही हक्क आहे, असे कोमल गणात्रा यांना वाटते. कोमल गणात्रा स्वत:च्या हिमतीवर यूपीएससीची परीक्षा पास झाल्या आहेत. त्यांच्यासाठी ही परीक्षा पास होणे एवढे सोपे नव्हते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर कोमल आयएएस झाल्या. जाणून घेवूयात त्यांची कहानी.

कोमल गणात्रा यांचा विवाह 26 व्या वर्षी झाला होता. लग्नानंतर मुली जी स्वप्न पाहतात, तशी स्वप्न कोमल यांनीही पाहिली होती, परंतु जरूरी नाही प्रत्येक स्वप्न पूर्णच झाले पाहिजे. लग्नाच्या दोन आठवड्यातच त्यांचा पती त्यांना सोडून गेला.

नववधू कोमल यांना इथेच सोडून त्यांचा पती न्यूझीलँडमध्ये निघून गेला. ज्यानंतर तो कधीच परत आला नाही. त्यांचे लग्न एका एनआरआयशी झाले होते. पतीने सोडल्यानंतर त्यांनी हिमतीने पुढील वाटचाल केली. त्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी सुरू केली.

कोमल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, आपल्याला वाटते की, लग्न आपल्याला परिपूर्ण बनवते. जोपर्यंत माझे लग्न झाले नव्हते तोपर्यंत मलाही असेच वाटायचे. पती सोडून गेल्यानंतर मला समजले की, एका मुलीसाठी लग्नच सर्वस्व नाही. तिचे जीवन यापेक्षाही बरेच काही आहे.

कोमल यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या युपीएससीच्या परिक्षेत यशस्वी झाल्या. त्या सध्या संरक्षण मंत्रालयात अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत.

कोमल यांचे शिक्षण गुजराती माध्यमातून झाले आहे. त्या गुजराती लिटरेचरमध्ये टॉपर आहेत. त्यांनी सांगितले की, सुरूवातीपासूनच माझ्या वडीलांनी जीवनात पुढे जाण्यास शिकवले. मी जेव्हा छोटी होते, तेव्हा वडील म्हणत असत की, तु मोठी होऊन आयएएस हो, परंतु त्यावेळेला मला तेवढी समज नव्हती.

कोमल यांनी सांगितले की, माझ्या वडीलांनी नेहमीच मला हिंमत दिली. त्यांनी मला समजावले की, तु श्रेष्ठ आहेस. त्यांनी ओपन यूनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केले आहे. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केले आहे.

लग्नापुर्वी कोमल यांनी 1000 पगारावर आपल्या करियरची सुरूवात केली होती. त्या शाळेत शिकवण्यासाठी सुद्धा जात होत्या. त्यांनी गुजरात लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा सुद्धा क्लियर केली होती. त्या म्हणाल्या, याच काळात माझा विवाह एनआरआयशी झाला. परंतु, त्यावेळी माझ्या पतीने जीपीएससीची मुलाखत देण्यास नकार दिला. कारण त्यांना न्यूझीलँडमध्ये राहायचे होते. मी परिस्थितीशी जुळवून घेत पतीचे म्हणणे ऐकले.

मला मुलाखत द्यायची होती, परंतु दिली नाही. कारण मी त्यांच्यावर प्रेम करत होते. म्हणून त्यांचे ऐकले. मला हे माहित नव्हते की, मी ज्याच्यावर प्रेम करत होते तो मला सोडून जाईल. ते सुद्धा लग्नाच्या 15 दिवसानंतर.

जेव्हा माझे माजी पती न्यूझीलँडला गेले तेव्हा त्यांनी मला एकही कॉल केला नाही. जेव्हा मला समजले की ते गेले आहेत, तेव्हा मी विचार केला की, त्यांच्या पाठीमागे न्यूझीलँडला जावे आणि त्यांना घेऊन परत यावे. कारण त्यावेळी माझे जगच थांबल्यासारखे झाले होते. माझ्या आयुष्यातील तो सर्वात मोठा धक्का होता.

काही कालावधीनंतर मला जाणीव झाली की, कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने आपल्या आयुष्यात आणता येऊ शकत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मागे धावत राहाणे जीवनाचे ध्येय असू शकत नाही. यामुळे मला जीवनाचे लक्ष्य स्पष्ट दिसू लागले.

पतीशी घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करण्याचा सल्लाही काही लोकांनी दिला. परंतु, कोमल यांनी ठरवले होते की, आता करियर बनवायचे आहे. त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निश्चय केला. यादरम्यान 5000 रूपयांची टीचरची नोकरी मिळाली. आपल्या आई-वडीलांपासून आणि सासरच्यांपासून दूर कोमल एका अशा गावात जाऊन राहू लागल्या जेथे इंटरनेट, मॅग्झीन, इंग्रजी वृत्तपत्र सुद्धा मिळत नव्हते. तरीही त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी केली.

युपीएससीची तयारी करताना त्यांनी एकही सुटी घेतली नाही. मुख्य परीक्षेदरम्यान कोमल मुंबई येथे परीक्षा देण्यासाठी जात होत्या. रात्रभर ट्रेनचा प्रवास करून मुंबईत पोहचत आणि रविवारी सायंकाळी पुन्हा गावात परत येत होत्या आणि सोमवारपासून शाळेत कामावर जात होत्या. मुलाखतच्या दरम्यान त्यांना दिल्लीला यायचे होते, तेव्हाही त्यांनी सुटी घेतली नव्हती. आज त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा आहेत.