IAS Son Of Farmer Meets Raju Shetty | IAS शेतकरी पुत्राकडे राजू शेट्टींनी काय मागितली गुरुदक्षिणा; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Son Of Farmer Meets Raju Shetty | शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरणारा, वेळप्रसंगी अधिकाऱ्यांबरोबर झगडणारा, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारा अशी ओळख असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांचा ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतकरी पुत्र खूप आदर करतात. हे अनेक वेळा पाहिलं आहे पण याचीच प्रचिती नुकतीच पुण्यात दिसून आली. विशेष म्हणजे राजू शेट्टींनी फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली आहे.

 

साखर आयुक्तालयात बैठकीसाठी बुधवारी राजू शेट्टी पुणे (Pune) येथे आले होते.
त्यावेळी त्यांची गाडी पुणे रेल्वे स्थानकापासून (Pune Railway Station) पुढे जात असताना त्यांना एक फोन आला.
साहेब मी साता-याहून IAS ओंकार पवार बोलतोय, मला आपणांस भेटायचं आहे. यानंतर ओंकारची साखर आयुक्त कार्यालयात भेट झाली.
ओंकारने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगात बाजी मारली.
आधी IPS व आता IAS या दोन्ही परिक्षा पास होणाऱ्या ओंकारला पाहिल्यानंतर राजू शेट्टींचे मन भरून आले. कारणही तसंच होतं.

ज्यावेळेस त्याने शेट्टी यांची भेट घेऊन आशिर्वाद घेत असताना तो म्हणाला की, “साहेब माझे वडील चांगले शेतकरी आहेत व मीही शेती करतच IAS झालो.”
त्यावेळी त्याचा पेढा भरवून सत्कार केला व त्यांनी ओंकारला सांगितले “ओंकार तू शेतकऱ्यांना विसरू नकोस हिच माझ्यासाठी गुरु दक्षिणा असेल !,
असे राजू शेट्टी यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, “शिवारात मशागत करणारा ओंकार हा निश्चितच प्रशासनात सामान्य जनतेच्या सेवेतून आई-वडिलांच्या संस्काराचे व स्वत:च्या कतृत्वाचे चांगले पिक आणेल याची मला खात्री आहे,” असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

 

 

Web Title :- IAS Son Of Farmer Meets Raju Shetty | omkar pawar dont forget the farmers when ias son of farmer meets raju shetty

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा