केरळमधील ‘या’ तरुणाचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी : ‘या’ गोष्टीमुळे त्याने घेतला ध्यास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक जण प्रशासकीय नोकरीत जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र प्रत्येकाला त्यात यश येते असे नाही. अनेक जण फार कष्ट करून तसेच मेहनत करून या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. अशाच यशाची कहाणी हि केरळमध्ये घडली आहे. जोसेफ के. मॅथ्यू  अतिशय खडतर परिस्थितीतून यूपीएससीमध्ये यश मिळवलेला तरूण. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून त्याने हे यश मिळवलेले आहे. पहिल्या प्रत्नात त्याला अपयश आले, मात्र त्याने आपली जिद्द न सोडता प्रयत्न करत राहिला आणि अखेर यश मिळवले. केरळमधील कोट्टयमचा रहिवासी असलेला जोसेफ दिल्लीतील एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर होता. त्याने सरकारी मेडिकल कॉलेजमधून मेडिकलची बॅचलर डिग्री घेतली आहे. मात्र दवाखान्यात काम करताना त्याचे मन त्याला शांत बसू देत नव्हते. त्याला भारतात नव्हे तर विदेशात काम करण्याची इच्छा होती.

नोकरी करत तो आपले स्वप्न पूर्ण करण्याची देखील तयारी करत होता. त्याच्या घरची स्थिती फारच बेताची होती. त्याची आई गृहिणी तर तर वडील रोजंदारीवर काम करायचे. मात्र शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्याला चांगलेच माहित होते आणि शिक्षणाचं आपल्याला मोठं करणार या ध्यासाने त्याने नोकरी करता करता यासाठी अभ्यास देखिल सुरु ठेवला. आणि त्यात त्याला अखेर यश आले. नोकरी लागल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना काम बंद करण्यासाठी सांगितले. मात्र १० -१२ तास नोकरी करून तो आपला अभ्यास करत होता. कमी वेळ मिळून देखील त्याने अखेर पाचव्या प्रयत्नात यश मिळवले आणि यूपीएससी परीक्षा आणि मुलाखत दोन्हीही पास झाला.

या गोष्टीमुळे त्याने घेतला ध्यास

कोणत्याही गोष्टीमागे काहीतरी प्रेरणा असते हेही तितकेच खरे. जोसेफच्या बाबतीत देखील तसेच काही घडले आहे. २०१६ मध्ये केरळमधील पुत्तिंगल मंदिरात मोठी दुर्घटना झाली होती. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत १०२ जण होरपळून मृत्यूमुखी पडले होते. यानंतर त्या घटनेने हेलावून गेलेल्या जोसेफने आयएएस ऑफिसर बनायचे ठरवले. आपण या पदावर गेलो तरच आपण अशा प्रकारच्या घटना रोखू शकतो, हे त्याने मनाशी पक्के केले होते.