IBPS Recruitment 2020 : सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती, महाराष्ट्रात सर्वाधिक जागा ! जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) नं क्लार्क पदासाठी (IBPS Clerk 2020 Recruitment) भरतीची जाहिरात काढली आहे. याद्वारे हजारो पदांवर जागा भरल्या जाणार आहेत.

देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये 2557 जागांवर ही भरती केली जाणार आहे. खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागवण्यात आले होते. मात्र पुन्ह ही भरती सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज करू शकले नव्हते त्याच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. अर्ज आणि नोटीफिकेशन लिकं खाली दिली आहे.

पदाचं नाव – क्लार्क (क्लेरिकल कॅडर)
पदांची संख्या – 2557

कोणत्या राज्यात किती जागा
उत्तर प्रदेश – 259
उत्तराखंड – 30
राजस्थान – 68
मध्य प्रदेश – 104
बिहार – 95
छत्तीसगड – 18
झारखंड – 67
दिल्ली – 93
महाराष्ट्र – 371
पश्चिम बंगाल – 151
पंजाब – 162
गुजरात – 139
चंदीगड – 08
गोवा – 25
हिमाचल प्रदेश – 45
जम्मू काश्मीर – 7
दादरा नगर हवेली /दमन दीव – 04
कर्नाटक – 221
केरळ – 120
लक्षद्वीप – 03
मणिपूर – 03
मेघालय – 01
मिझोराम – 01
नागालँड – 05
ओडिशा – 66
पुदुच्चेरी – 04
आसाम – 24
सिक्कीम – 01
तमिळनाडू – 229
तेलंगणा – 62
त्रिपुरा – 12
आंध्र प्रदेश – 85
अरुणाचल प्रदेश – 01

वय आणि शिक्षणाची अट
– उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
– वय 6 नोव्हेंबर रोजी 20 ते 28 असावं
– आरक्षणातील उमेदवारांना वयाची अट शिथील असेल.

शुल्क
सामान्य, ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहेत. तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाटी अर्ज शुल्क 175 आहे.

महत्त्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू होण्याची तारीख – 23 ऑक्टोबर
बंद होण्याची तारीख – 6 नोव्हेंबर
हॉल तिकीट मिळण्याची तारीख – 18 नोव्हेंबर
ऑनलाईन प्रिलिम्स परीक्षा – 5, 12, 13 डिसेंबर
प्रिलिम्स निकालाची घोषणा – 31 डिसेंबर 2020
ऑनलाईन मुख्य परीक्षा – 24 जानेवारी 2021

भरतीची लिंक –
https://www.ibps.in/wp-content/uploads/DetailedAdvtCRPClerksX.pdf?_ga=2.212939292.943236444.1602902783-763477693.1584512576

पुन्हा सुरू करण्यात आलेली लिंक –
https://www.ibps.in/wp-content/uploads/CRP_Clerks_Supplementary_Advt.pdf?_ga=2.212939292.943236444.1602902783-763477693.1584512576

अर्ज करण्यासाठीची लिंक 23 ऑक्टोबरला सुरू होईल. त्यासाठी इथं क्लिक करा-
https://www.ibps.in/crp-clerical-cadre-x/?_ga=2.215576863.943236444.1602902783-763477693.1584512576