क्रिकेट : ‘आयसीसी’नं ठरवलं ! आता निर्णायक सामना लॉर्ड्समध्ये नव्हे तर साऊथॅम्प्टन येथे खेळविणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने बुधवारी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, क्रिकेटमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निर्णायक सामना लॉर्ड्सच्या बदल्यात साऊथॅम्प्टनमधील एजस् बोलमध्ये खेळविण्यात येणार आहे. याचवेळी ही माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने हेही स्पष्ट केले आहे की, भारत 18 ते 22 जून 2021 दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध साऊथॅम्प्टनच्या एजस् बाऊल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला सामना खेळविला जाणार आहे. मात्र, पूर्वी हि बातमी समजत होती की, डब्ल्यूटीसीचा पहिला सामना 18 जून रोजी लॉर्ड्सवर खेळविला जाणार आहे.

त्याचबरोबर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, कोरोना महामारी लक्षात घेऊन आयसीसीचा वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना 18 जून रोजी साऊथॅम्प्टनच्या एजस् बाऊल स्टेडियमवर होईल.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये भारत 520 गुणांसह (72.2%) प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड 420 गुणांसह (70.0%) दुसर्‍या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 332 गुणांसह 69.2 गुणांसह तिसर्‍या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीत स्थान गमावले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर अवघ्या तीन दिवसांत चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकून भारताने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. सामन्यात भारतीय संघाने इंग्लिश संघाचा 25 धावांनी पराभव करत चार सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशी जिंकली आहे.