महेंद्रसिंग धोनीनंतर ‘या’ खेळाडूला आयसीसीचा दणका : करावे लागणार ‘हे’ काम

लंडन : वृत्तसंस्था – भारतीय खेळाडू महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर आता आणखी एका खेळाडूला आयसीसीने दणका दिला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हज प्रकरणानंतर आता विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला देखील आपल्या बॅटवरील स्टिकर बदलावे लागण्याची शक्यता आहे. स्वत:ला ‘युनिवर्सल बॉस’ म्हणवणाऱ्या गेलनं याच नावाचा लोगो आपल्या जर्सीवर वापरण्याची परवानगी आयसीसीकडे मागितली होती. त्यामुळे भाविष्यात आयसीसी त्याच्या बॅटवरील स्टिकरवर देखील बंदी आणू शकते.

यासाठी त्याने आयसीसीकडे परवानगी मागितली होती, मात्र आयसीसीने त्याची मागणी फेटाळून लावत अशा प्रकारचे कोणतेही स्टिकर त्याला जर्सीवर लावता येणार नसल्याचे सांगितले आहे. याविषयी त्याला सांगण्यात आले कि, जर धोनी बलिदान लोगो असलेला ग्लोव्हज वापरू शकत नाही तर गेलदेखील अश्या प्रकारे कोणतेही स्टिकर वापरू शकत नाही.

आयसीसीचे नियम काय सांगतात

आयसीसीच्या जी १ नियमानुसार,कोणत्याही संघातील खेळाडू किंवा अधिकाऱ्यांना लष्करी बॅंड किंवा कपडे किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये व्यक्तिगत संदेश देऊ शकत नाही. जर तसे करायचे असल्यास त्याकरिता क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसी यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. राजकीय, धार्मिक किंगा रंगभेद यावरील वक्तव्य किंवा कृतीसाठी बोर्ड परवानगी देत नाही. त्यामुळे कोणताही खेळाडू किंवा संघ अश्या प्रकारे उल्लंघन करू शकत नाही. जर कोणत्याही खेळाडूने अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केलं तर त्यांना कडक शिक्षा किंवा दंड होऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक