World Cup 2019: भारतीय संघातील ‘हा’ खेळाडू सर्वात ‘घाणेरडा’ आणि ‘अस्वछ’ : रोहित शर्मा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-जगात सध्या आयसीसी विश्वचषकाचा ज्वर आहे. त्यात या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भारतीय संघही जोरदार तयारी करत आहे. संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ विश्वचषक खेळत आहे. संघाचे सर्वच खेळाडू सध्या संघ बांधणीवर भर देत आहेत.

खेळाडूंबाबत त्यांच्या चाहत्यांना नेहमीच नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या मैत्रीचेही काही चाहते आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायलाही सर्वांना आवडते. नुकतंच एका व्हिडीओ मुलाखतीत रोहित शर्मानं शिखर धवन बाबत एक मोठा गौप्यस्पोट केला आहे. शिखरसह त्याने संघातील इतर खेळाडूंबाबतही मोठा खुलासा केला आहे. आयसीसीनं शेअर केलेल्या या व्हिडिओत एकमेकांबद्दलचे अनुभव शेअर केले आहेत. यात रोहित शर्माला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये रोहितने शिखर धवन हा अत्यंत घाणेरडा आणि अस्वच्छ असा खेळाडू आणि रूममेट असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत सतत फोन घेऊन बसणाऱ्या खेळाडूंबाबतही त्याने सांगितलं आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांचा. तर, सगळ्यात जास्त सेल्फी काढणारा, वाईट डान्सर, गुगलवर स्वतःचेच नाव सर्च करणारा कोणता खेळाडू याचे उत्तरही त्यानं हार्दिक पांड्या असेच दिले. भारतीय संघ मजा-मस्ती करत असला तरी, त्यांचा सध्या कसुन सराव सुरु आहे.

दरम्यान, ३० मेपासून विश्वचषकासाठी सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ रवानाही झाला आहे. विश्वचषकासाठी संघातील खेळाडू कसून तयारी करत आहेत. भारताचा पहिला सामना साऊथ आफ्रिकेविरोधात ५ जूनला होणार आहे. तर, सध्या सराव सामने सुरु आहेत. पहिल्या सराव सामन्यात भारताला चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र विश्वचषकासाठी मैदानात उतरल्यावर त्यांची जादू पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

https://twitter.com/ICC/status/1132847845961338882