विराट कोहली करणार ICC Men’s Test Team Of The Decade चे नेतृत्व

पोलिसनामा ऑनलाईन – दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचे ( ICC Men’s Test Team of the Decade) नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. विराटसह अंतिम ११मध्ये आर अश्विन या भारतीय खेळाडूचा समावेश आहे.दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं पटकावले आहे. ट्वेंटी-20 पाठोपाठ वन डे संघाचे नेतृत्वही धोनीकडेच सोपवण्यात आले आहे. अंतिम ११मध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. ICC च्या दशकातील पुरस्कारांची आज घोषणा झाली. आयसीसीनं यासाठी ऑनलाईन मतदान घेतलं होतं आणि त्यानुसार ही घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा ( Rohit Sharma), विराट कोहली ( Virat Kohli), एबी डिव्हिलियर्स ( AB Devilliers), महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आणि लसिथ मलिंगा (Lasith Malinga) यांनी दोन्ही संघांत स्थान पटकावले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक नामांकन मिळालेला खेळाडू ठरला आहे. कोहलीला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू, दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू अशा तिन्ही प्रकारात नामांकन मिळालं आहे. दशकातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या शर्यतीत कोहलीसोबत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, श्रीलंकेचा माजी डावखुरा गोलंदाज रंगना हेराथ, पाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शहा, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांचाही समावेश आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सध्याच्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसीथ मलिंग यांना दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचं नामांकन मिळालं आहे. सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूच्या शर्यतीत विराट कोहलीसह अफगाणिस्तानचा फिरकीकटू राशीद खान, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर यांचाही समावेश आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी विराट कोहली, आर.अश्विन, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, जो रुट यांच्यासह एकूण सात जणांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) नामांकन मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कुमार संगकारा आणि एबीडी व्हिलिअर्स यांचाही यात समावेश आहे. तर महिला क्रिकेटमध्ये भारताच्या मिताली राज, न्यूझीलंडच्या सूएज बॅट्स, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि इलाइस पेरी, इंग्लंडच्या सराह टेलर आणि वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर यांनाही दहशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठीचं नामांकन मिळालं आहे.

– दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ – अ‍ॅलेस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली ( कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

– दशकातील सर्वोत्तम वन डे संघ – रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शकिब अल हसन, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा.

– दशकातील सर्वोत्तम महिलांचा वन डे संघ- अ‍ॅलिसा हिली, सुझी बॅट्स, मिताली राज, मेग लॅनिंग ( कर्णधार), स्टेफनी टेलर, साराह टेलर, एलिसे पेरी, डेन व्हॅन निएकर्क, मेरीझॅपे कॅप्प, झुलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद

– दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ – रोहित शर्मा, अ‍ॅरोन फिंच, ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी ( कर्णधार), किरॉन पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा. दशकातील सर्वोत्तम ट्वेंटी-20 संघ महिला – अ‍ॅलिसा हिली, सोफी डेव्हिन, सुझी बॅट्स, मेग लॅनिंग ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफनी टेलर, डेंड्रा डॉटिन, एलिसा पेरी, अ‍ॅन श्रुबसोल, मीगन स्कट, पूनम यादव

– स्कॉटलंडच्या कॅथरीन ब्रीसनं आयसीसीच्या संलग्न संघटनेतील दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा मान पटकावला. तिनं ५०च्या सरासरीनं धावा केल्या , तर ९.९३च्या सरासरीनं गोलंदाजी केली. आयसीसीच्या संलग्न संघटनेतील दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा मान कायले कोएत्झरनं पटकावला. स्कॉटलंडच्या या फलंदाजानं ४५.५४च्या सरासरीनं २२७७ धावा केल्या.