ICC T20 Ranking | पाक विरूद्धच्या जबरदस्त खेळीमुळे विराट बॅटिंग रँकिंगच्या टॉप-10 मध्ये, सूर्यकुमारला मात्र फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान विरुद्ध भारत (Pakistan vs India) टी-20 च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने केलेल्या जबरदस्त खेळीचा त्याला नुकत्याच जाहीर झालेल्या टी 20 रँकिंगमध्ये (ICC T20 Ranking) देखील फायदा झाला आहे. अनेक महिन्यांनंतर विराट कोहली (Virat Kohli) टी 20 बॅटिंग रँकिंगच्या (ICC T20 Ranking)  टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे. तर रँकिंगमध्ये दुसर्‍या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) मात्र फटका बसला.

ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप 2022 (T-20 World Cup 2022) मध्ये भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली. याचा फायदा विराटला झाला असून या खेळीनंतर विराट कोहलीने टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये (ICC T20 Ranking) पाच स्थानांची उसळी घेतली आहे. तो आता टॉप 10 मध्ये दाखल झाला आहे. तो सध्या 9 व्या स्थानावर विराजमान आहे. या यादीत पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) हा 849 रेटिंग पॉईंट घेऊन अव्वल स्थानावर कायम आहे.

न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवॉयने (Devon Convoy) ऑस्ट्रेलियाविरूद्ध 92 धावांची दमदार खेळी केल्याने तो 831 रेटिंग पॉईंट घेऊन तीन स्थानांची सुधारणा करत दुसरे स्थान पटकावले. तर भारताचा सूर्यकुमार यादवची घसरण झाली आहे. 828 रेटिंग पॉईंट असलेला सूर्या तिसर्‍या स्थानावर घसरला आहे. त्याच्या खालोखाल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) 799 रेटिंग पॉईंटसह चौथ्या स्थानावर आहे. 762 रेटिंग पॉईंटसह दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम (Aiden Markram) पाचव्या स्थानावर आहे.

ICC Player Rankings for T20 Batsmen

1 Mohammad Rizwan – Pakistan
2 Devon Conway – New Zealand
3 Suryakumar Yadav – India
4 Babar Azam – Pakistan
5 Aiden Markram – South Africa
6 Dawid Malan – England
7 Aaron Finch – Australia
8 Pathum Nissanka – Sri Lanka
9 Virat Kohli – India
10 Muhammad Waseem – United Arab Emirates

Web Title :-  ICC T20 Ranking | icc mens t20 players ranking virat kohli enter in top 10 after long time suryakumar dropped to the third spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस; सदस्यांनी विचारले प्रश्न, म्हणाल्या – ‘हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन’

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान