ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वाढत्या कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL- 2021) स्थगित करण्यात आला होता. यांनतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचे (IPL- 2021) उर्वरित 31 सामने होतील असं बीसीसीआयनं (BCCI) जाहीर केलं होतं. हे उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत यूएईत होणार आहेत. त्याप्रमाणे तर आता IPL- 2021 ची फायनल होताच दोन दिवसामध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती समोर आलीय. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (Twenty20 World Cup) तारखा समोर आल्या आहेत. IPL नंतर लगेच T-20 ला सुरुवात होणार असल्याने खेळाडूची धमछाक होणार आहे. icc t20 world cup set begin october 17 uae final november 14

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आयपीएल (IPL) फायनल संपताच दोन दिवसांत ट्वेंटी-20 वर्ल्डकपचा (Twenty20 World Cup) रणसंग्राम सुरू होणार आहे.
तर, आयसीसी ट्वेटी-20 वर्ल्ड कपला (ICC T20 World Cup) आता 17 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला फायनल होणार आहे.
तसेच, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताचा होता.
पण भारतातील कोरोना परिस्थितिचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्यासाठी
BCCI ने ICC कडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार 28 जूनला ती मुदत संपत आहे.
तर, BCCI ने ही स्पर्धा यूएईत हलवण्याचे अधिकृत पत्र अजून ICC ला दिलेले नाही.
म्हणून ट्वेंटी-20 स्पर्धा नेमकी कुठे होणार हे अजून अस्पष्ट आहे.

दरम्यान, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये (Twenty20 World Cup) सहभागी होणाऱ्या 16 टीमची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येईल आणि त्यांचे सामने यूएई (UAE) व ओमान येथे खेळवण्यात येतील.
अशी माहिती समोर आलीय. त्याचप्रमाणे, पहिल्या फेरीमध्ये 12 सामने होतील आणि दोन गटांतील आघाडीवर असलेले प्रत्येकी 2-2 असे 4 संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील.
बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी
यापैकी 4 संघ सुपर 12 मध्ये प्रवेशासाठी खेळतील.
ICC क्रमवारीत पहिल्या 8 क्रमांकावर असलेल्या टीम पूर्वीच सुपर 12 साठी पात्र ठरलेले आहेत.
सुपर 12 मध्ये 30 सामने होतील आणि 24 ऑक्टोबरला या सामन्यांची सुरुवात होईल.
सुपर 12 संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह या 3 मैदानावर होतील.
त्यानंतर 3 प्ले-ऑफ सामने, 2 सेमी फायनल व 1 फायनल या पद्धतीने होणार आहे.

Web Title : icc t20 world cup set begin october 17 uae final november 14

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Gold Rates Today | सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या