वर्ल्ड कप-२०१९ :’जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, केदार जाधवचे वरूणराजाला भावनिक साकडं

इंग्लंड : वृत्तसंस्था – सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या विश्वचषक सुरु आहे. तसंच विश्वचषकात भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. त्यात आता पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड आता पर्यंत एकही सामना हरलेला नाही. त्यामुळे हा सामना चाहत्यांसाठी मेजवानी ठरू शकते. मात्र चाहत्यांसाठी निराशेची बाब म्हणजे येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यात पाऊसही उपस्थिती लावू शकतो. क्रिकेट प्रेमी आता हा पाऊस पडू नये म्हणून देवाला गाऱ्हाणं घालत आहेत. तर भारतीय संघाचा खेळाडू केदार जाधव हाही देवाकडे प्रार्थना करत आहे.

केदारने पावसाकडे गाऱ्हाण गायलं आहे. पावसा तुझी इथे नॉटिंगहॅम मध्ये नाही तर महाराष्ट्रात तुझी गरज आहे. तिथं जाऊन पड अशी विनंती केदारने केली आहे. त्याचा तसा व्हीडिओ व्हायरलं होत आहे. केदार जरी विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये असला तरी तो देशातील आणि राज्यातील दुष्काळासंदर्भात उदासीन आहे. त्यामुळेच तो वरूण राज्याला महाराष्ट्रात पड म्हणून सांगत असावा.

दरम्यान, विश्वचषक २०१९ मध्ये भारताने विजयी घोडदौड सुरु केली. मात्र यात सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर पर्यायी व्यवस्था केली आहे. मात्र शिखरची जागा कोणी भरून काढू शकत नाही. शिखरने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सामन्यात शकत लगावले. तसंच न्युझीलंडशी सराव सामना झाला होता. तेव्हा त्यात भारताला एकतर्फी पराभव पत्करावा लागला. तसंच क्रिकेटमध्ये इंग्लंडला त्यांच्याच देशात हरवणे आतापर्यंत भारताला एकदाही जमलेले नाही. त्यामुळे भारतापुढे पावसासह बलाढ्य संघाची अडचण असनार आहे. यात पावसावर नाही पर इंग्लंडवर मात करण्यात भारताला यश येते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

आता एन्डोस्कोपीद्वारे वजन कमी करता येणार

या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती