ICC World Cup 2023 | क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक

ADV

मुंबई : क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ विश्वकप २०२३ चा (ICC World Cup 2023) अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium Ahmedabad) होणार आहे. क्रिकेट प्रेमींच्या या सर्वात मोठ्या उत्सावात रेल्वे सुद्धा सहभागी झाली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (India vs Australia) महालढतीसाठी रेल्वे मुंबईतून वर्ल्डकप (ICC World Cup 2023) स्पेशल ट्रेन (Special Train) सोडणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक असे आहे की प्रेक्षक सामन्याच्या काही तास अगोदर मैदानात पोहचू शकतात.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या अंतिम लढतीसाठी गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे बुकींग फुल्ल झाले आहे. मुंबईतून हजारो क्रिकेटप्रेमी अहमदाबादला जाणार आहेत.

ADV

मध्य रेल्वेने अहमदाबादला जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी सुरू केलेली वर्ल्डकप स्पेशल ट्रेन (World Cup Special Train) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) सुटणार आहे.

मुंबईतील सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद इत्यादी थांबे घेत ही स्पेशल ट्रेन धावणार आहे. ०११५३ हा गाडी नंबर आहे. १८ नोव्हेंबर रोजी सीएसएमटीवरुन ही ट्रेन रात्री १०.३० वाजता निघणार आहे. अहमदाबादला सकाळी ६.४० वाजता तो पोहचेल. (ICC World Cup 2023)

अहमदाबादहून मुंबईकडे येताना २० नोव्हेंबर रोजी रात्री १.४५ वाजता निघेल. सकाळी १०.३५ वाजता ही ट्रेन मुंबईत पोहोचेल.

वर्ल्डकप स्पेशल ट्रेन वेळापत्रक

१) 01153 सीएसएमटी-अहमदाबाद स्पेशल एक्स्प्रेस-
सीएसएमटी प्रस्थान – 22.30 वाजता, 18/11/23
अहमदाबाद आगमन – 06.40 वाजता, 19/11/23

२) 01154 अहमदाबाद – सीएसएमटी स्पेशल एक्सप्रेस-
अहमदाबाद निर्गमन – 01.45 वाजता, 20/11/23
सीएसएमटी आगमन – 10.35 वाजता, 20/11/23

थांबा – सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा, अहमदाबाद.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोच्या कामात पुढचे पाऊल, रूळ बसवण्याचे काम सुरू

जरांगेंचा एकेरी उल्लेख करत भुजबळांनी केला मराठा समाजाला सवाल, दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला?