Pune Metro | हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोच्या कामात पुढचे पाऊल, रूळ बसवण्याचे काम सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे (Hinjewadi – Shivajinagar Metro Route) रूळ बसवण्याच्या कामास शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. डेपोमध्ये यशस्वी चाचणी घेतल्यानंतर प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. आयटी सिटी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत वाहतुकीचा प्रश्न खुपच बिकट झाला आहे. या मेट्रो (Pune Metro) मार्गामुळे यातून सुटका होण्यास मदत होईल. हा मार्ग येथील कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो.

हिंजवडी – शिवाजीनगर या २३ किलोमीटर अंतराच्या मार्गावर वाहतुकीची स्थिती गंभीर आहे. प्रदुषण व इतर समस्या देखील त्रासदायक ठरत आहेत. हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्ग या समस्यांवर उपाय ठरणार आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर हा संपूर्ण मेट्रो (Pune Metro) मार्ग उन्नत (इलेव्हेटेड) आहे. त्यावर २३ स्थानके आहेत. खांब उभारणीचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. स्थानक उभारणीचे काम वेगात सुरू आहे. आता शुक्रवारपासून आणखी एक पुढील पाऊल टाकण्यात आले असून प्रत्यक्ष मार्गावर रूळ बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण Pune Metropolitan Region Development Authority (पीएमआरडीए – PMRDA) च्या संनियंत्रणात हे काम सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर सुरू आहे. खासगी कंपनीने निविदेद्वारे हे काम घेतले आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची कामाच्या प्रत्यक्ष नियंत्रणासाठी स्थापना केली आहे. करारनुसार, खासगी कंपनीने काम पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडेच पुढील ३५ वर्षांसाठी या मेट्रोच्या संचलनाची जबाबदारी असणार आहे.

या मेट्रो मार्गाच्या कामाची माहिती देताना पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (Pune IT City Metro Rail Limited)
मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी म्हटले की,
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे सहयोगी एकॉम आणि एसजीएस च्या सजग नजरेखाली रुळांच्या
विविध प्राथमिक चाचण्या घेण्यात येत आहेत.

आलोक कपूर म्हणाले, हिंजवडी – शिवाजीनगर मेटड्ढोच्या २३.३ किमी मार्गासाठी रेल टड्ढॅकची
एकूण आवश्यकता, त्यांचे स्केलिंग, या रुळांची देखभाल अशा अनेक गोष्टींचे नियोजन सुरू आहे.
सुरक्षेच्या बाबतीत काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | जरांगेंचा एकेरी उल्लेख करत भुजबळांनी केला मराठा समाजाला सवाल,
दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला?

Pune Pimpri Crime News | डुकरांसह टेम्पो लांबविला, चार जणांना अटक; महाळुंगे येथील घटना

Prakash Shendge | प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा, ”कुणब्यांचे दाखले देणे बंद करा, नाहीतर…”