Coronavirus : दुसऱ्या लाटेत तरुण होताहेत सर्वाधिक कोरोनाबाधित; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. पण तरुणवर्ग कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात सापडले आहेत.

जेव्हा कोरोना व्हायरसची पहिली लाट आली होती त्यावेळी तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण आत्ताच्या तुलनेने कमी होते. पण या लाटेत तरुणांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसचे दैनंदिन 4 लाख प्रकरणे समोर आली होते. मात्र, आता हा आकडा कमी होताना दिसत आहे. याबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महाव्यवस्थापक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले, की तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. याची दोन कारणे असू शकतात.कोरोनाचा नवा वेरियंट तरुणांना जास्त प्रभावित करत आहे. ते घरातून बाहेर पडत असल्याने कोरोनाबाधित होताना दिसत आहे.

तसेच लहान मुलेही बाधित होत आहे. त्यावर डॉ. भार्गव म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान वयात जास्त अंतर नाही. आम्ही ऑगस्टपासून यावर लक्ष ठेऊन आहोत. 45 पेक्षा जास्त वय असणारे लोक कमकुवत आणि रुग्णालयात मृत्यूदर 9.6 ते 9.7 टक्के आहे. सध्या 32 टक्के रुग्ण 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.