तुम्ही सुद्धा ‘कुकर’मध्ये जेवण बनवता तर व्हा ताबडतोब सावध, आरोग्याचे होऊ शकते नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन – Health Care Tips : जेवण लवकर शिजवण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी आपण नेहमी प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवतो. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ताबडतोब सावध होण्याची गरज आहे. तुम्हाला माहित आहे का की वेळ वाचवण्यासाठी आणि थोडे इंधन वाचवण्याच्या नादात तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात?

तज्ज्ञांनुसार, प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणे आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर असते, त्यापेक्षा जास्त ते नुकसानकारक आहे. काही वस्तू कुकरमध्ये शिजवून खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वस्तू कुकरमध्ये शिजवून खाव्यात आणि कोणत्या नाही.

जर तुम्ही पोषकतत्वांनी युक्त भाज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. कुकरमध्ये या भाज्या शिजवून खाल्ल्याने त्यांच्यामधील पोषकतत्व बाहेर जात नाहीत.

परंतु, जर तुम्ही भरपूर स्टार्च असलेले जेवण प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल, तर हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. बटाटा, पास्ता, तांदूळ यासारख्या वस्तू प्रेशर कुकरमध्ये शिजवून अजिबात खाऊ नये. हे कुकरमध्ये शिजवल्याने अ‍ॅक्रीलामाइड नावाचे हानिकारक केमिकल तयार होते. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

या जेवणामुळे तुम्हाला कॅन्सर आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर सारखे आजार होऊ शकतात. याशिवाय चिकन आणि मटण बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. बहुतांश लोक हे शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. असे करणे योग्य सुद्धा आहे. उघड्या भांड्यात शिजवलेले चिकन किंवा मटण पचवण्यास सुद्धा जड असते. तर कुकरमध्ये शिजवलेले चिकन सहज पचन होते.