‘या’ राज्यात नोकरी करायची असेल तर मग सोडवी लागेल सिगरेट अन् तंबाखू

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – सरकारी नोकरी म्हटलं की सर्वाना हवीच असते. ती मिळवण्यासाठी सागेलच प्रयत्न करत असतात. पण झारखंड सरकारने सरकारी नोकरीसाठी एक अनोखी अट ठेवली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता येणार नाही किंवा भविष्यात ते या पदार्थांचं सेवन करणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. असे सर्कर्ण म्हंटल आहे. हा नियम पुढील वर्षी १ एप्रिलपासून झारखंडमध्ये लागू होणार आहे. हा नियम त्याच उमेदवारांसाठी असेल, जे झारखंड सरकारच्या कोणत्याही विभागात नोकरीसाठी अर्ज करत आहेत.

नुकत्याच रांची येथे झालेल्या झालेल्या तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. येथे चहा-बिस्किटांची विक्री होणार नाही, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तंबाखूजन्य पदार्थंची विक्री करण्यासंदर्भतील निर्णयांवर सर्वांचे एकमत झालं पाहिजे. यामुळे नवीन पिढीला तंबाखूचे सेवन करण्यासारख्या वाईट सवयीपासून वाचवण्यासाठी मदत होईल. असे या अहवालात झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचा हवाला देत असं म्हटलं आहे.

सरकारी कर्यलाबाहेरही तंबाखूजन्य पदार्थ सेवा करता येणार नाही
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रणचे राज्य नोडल अधिकारी एलआर पाठक यांच्या मते, समितीने हा नियम एप्रिल २०२१ पासून लागू होईल असा निर्णय घेतला आहे. हे प्रतिज्ञापत्र झारखंड सरकारमध्ये नोकरी करू इच्छित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला द्यावं लागेल. ते केवळ कार्यालयातच नाही तर कार्यालयाबाहेरही तंबाखूशी संबंधित उत्पादनांचे सेवन करू शकणार नाहीत.

भाजपकडून उपक्रमाचे स्वागत
राज्य सरकारच्या या उपक्रमाचे भाजपने स्वागत केलं आहे. राज्य सरकारने दारू बंदीबाबत विचार करायला हवा, असे भाजप नेते शिवपूजन पाठक यांनी म्हंटले आहे. त्याचप्रमाणे राज्याला नशामुक्त करण्यावरही काम करणं आवश्यक आहे. यावर्षी एप्रिलमध्ये झारखंड सरकारने तंबाखूच्या सर्व प्रकारच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे हे स्पष्ट करा. यामध्ये सिगरेट, बिडी, पान मसाला, खैनी इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ आहे.