काय तुमची मुलं देखील दारावरील आणि गार्डनमधील माती काढून खातात, असं असेल तर व्हा सावध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तुम्ही नेहमी लहान मुलांना माती खाताना पाहिले असेल. कदाचित तुमचे मुल सुद्धा घराची भिंत खरवडून किंवा गार्डनमधून माती काढून खात असेल. अनेक लोक यास बालपणीचे उद्योग समजून हसून दुर्लक्ष करतात. जर असे होत असेल तर सावध होण्याची आवश्यकता आहे कारण हे आजाराकडे इशारा करते, ज्याचा सामना तुमचे मुल करत आहे. या डिसऑर्डरला पीका म्हणून ओळखले जाते. जर मुल माती, पेंट, प्लास्टर, चॉक, कॉर्नस्टार्च, साबण किंवा अशाच वस्तू खात असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.

10 ते 20 टक्के मुलांना होतो आजार

पीका डिसऑर्डर मुलांमध्ये खुपच सामान्य समस्या आहे. एका संशोधनानुसार 10 ते 20 टक्के मुले पीका डिसऑर्डरने कधी ना कधी ग्रस्त असतात. जोपर्यंत ते किशोरावस्थेत जात नाहीत तोपर्यंत ते या डिसऑर्डरने ग्रस्त राहतात. काही संशोधनानुसार केवळ मुलेच नव्हे, काही प्रौढांमध्ये सुद्धा हा डिसऑर्डर दिसून आला आहे.

अमेरिकन वेबसाइट पिडियाट्रिकऑनकॉल.कॉम नुसार माती, चॉक किंवा अशा वस्तू खाण्याची सवय 1 ते 7 वर्षाच्या मुलांमध्ये जास्त दिसून येते. अनेकदा पालक या सवयीमुळे मुलांना ओरडतात आणि काहीजण मारतात सुद्धा. परंतु असे करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

समाधान होईपर्यंत खातात माती

डॉक्टरांनुसार मुलांनी माती खाणे हे त्यांच्यात रक्ताची कमतरता असल्याचे लक्षण आहे. काही आई-वडील आपल्या मुलांना केवळ दुध देतात. यामुळे त्यांच्यात रक्ताची कमतरता होऊ शकते. मुलांच्या आहारात धान्य, डाळी किंवा भाजीची कमतरता असल्यास ही समस्या दिसून येते. माती खाण्याची सवय असेल तर ऑटिज्म नावाचा आजार सुद्धा असू शकतो. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) कडून सांगण्यात आले आहे की, मुल तोपर्यंत माती खाते जोपर्यंत त्याचे समाधान होत नाही की त्याचे पोट भरले आहे.

मुलांमध्ये आयर्न आणि झिंकची कमतरता

एनसीबीआयनुसार पीकामुळे मुलांच्या रोजच्या हालचालींवर परिणाम होऊ लागतो. मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब आयर्नची कमतरता दूर करणारी औषधे मुलांना सुरू केली पाहिजेत. सोबतच मुलांना हे सुद्धा सांगा त्यांना काय खायचे आहे आणि कशापासून दूर रहायचे आहे. त्यांना हे सांगणे आवश्यक आहे की यामुळे त्यांना फायदा होणार की नुकसान. मुलांमध्ये झिंकची कमतरता सुद्धा पिकाचे कारण असू शकते

आजारावर कोणताही उपचार नाही

पीकाची कोणतीही ट्रीटमेंट नाही. तज्ज्ञांनुसार, या डिसऑर्डरसाठी तुम्हाला तुमच्या न्युट्रीशियनलकडून सल्ला घेतला पाहिजे. मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करून हा डिसऑर्डर दूर करू शकता. जर न्युट्रीशियनचा सल्ला कमी वाटला तर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. कौन्सिलिंग, बिहेवियरल थेरेपीचा सल्ला दिला जाऊ शकतो.