PAK : इमरान खान यांचा वाचला सन्मान, 178 मत घेऊन प्राप्त केलं विश्वास मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानातील हलाखीच्या परिस्थितीला जबाबदार असल्याचे म्हणत अविश्वास निर्माण झालेल्या पंतप्रधानांना दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानने नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत मिळवले आहे. अविश्वास प्रस्तावावर शनिवारी असेंब्लीमध्ये झालेल्या मतदानात त्यांनी विजय मिळविला आहे. इम्रान खानच्या बाजूने 178 मते मिळाली. वास्तविक, पाकिस्तानमधील सिनेट निवडणुकीत अर्थमंत्री अब्दुल हफीझ शेख यांचा पराभव झाल्यामुळे इम्रान खानच्या सरकारला नॅशनल असेंब्लीमध्ये विश्वास मत प्रस्ताव पेश करावा लागला. परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी हा प्रस्ताव मांडला. यावेळी झालेल्या मतदानात इम्रान खान यांच्या बाजूने 178 मते पडली.

त्यापूर्वी विरोधकांनी विश्वास मत प्रस्तावावर मतदाना दरम्यान संसदेवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली होती. मात्र, यामुळे इम्रान खानला दिलासा मिळाला. विश्वास मत प्रस्ताव सादर होण्याआधी इम्रान खान यांनी आपल्या खासदारांना पार्टी लाईन फॉलो करण्यास सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सांगितले कि, विश्वास मतासाठी होणाऱ्या मतदानात जो निर्णय येईल ते त्याचा आदर करतील. यात त्यांचा पराभव झाला तर ते विरोधी पक्षात बसण्यास तयार आहेत.

का पडली विश्वास मताची गरज ?

दरम्यान, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे ( PDM ) उमेदवार आणि माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी बुधवारी सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ ( PTI) चे उमेदवार अब्दुल हफीझ शेख यांचा पराभव केला. यामुळे इम्रान खानला मोठा धक्का बसला. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी पक्ष आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांसमवेत बैठक घेऊन फ्लोअर टेस्टची घोषणा केली.