कर्जमाफी न मिळाल्यामुळे बुलढाण्यात शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

बुलडाणा: पोलीसनामा ऑनलाईन 
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एका दाम्पत्याने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असून देखील कर्जमाफी न मिळाल्यामुळे या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. रमेश सावळे आणि विद्या सावळे असे या दाम्पत्याचे नाव आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’337fec00-b271-11e8-a3a9-0b5f7eea7809′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुलढाण्यातील मोताळा गावात या दाम्पत्याची ३ एकर  शेती आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्यामुळे ते सतत तणावाखाली होते. सरकारकडून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली मात्र त्याचा फायदा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचला नाही. बुलढाण्यात या शेतकरी दाम्पत्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत असताना देखील त्यांना कर्जमाफी मिळाली नाही . त्यामुळेच त्यांनी घराशेजारील विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या टोकाच्या पाऊलामुळे त्यांच्या पश्चात असलेला ३ वर्षांचा एकुलता एक मुलगा पोरका झाला. दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.

झोपलेल्या भाजी विक्रेत्यावर ओतले उकळते तेल

भाजप सरकार ने मोठ्या धुमधडाक्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली खरी पण सरकारची ही कर्जमाफी गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहचलीच नाही . त्यामुळंच आधीच खराब हवामानामुळे हवालदिल झालेला शेतकरी आणखीनच चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. यातूनच बुलढाण्यात शेतकरी दाम्पत्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यात १ मार्च ते ३० मे या तीन महिन्यात ६३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे एका वृत्तपत्राकडून केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

राज्यात जून महिन्यात तब्बल १२६१ बालकांचा मृत्यू