दहा महिन्यात गमावली २३ लाख लोकांनी नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या आकडेवारीचा दाखला देत गेल्या एका वर्षात संघटीत क्षेत्रात ७० लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. मात्र, देशाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार तब्बल २३ लाख लोकांना मागच्या दहा महिन्यांत आपला रोजगार गमवावा लागल्याची माहिती सांख्यिकी मंत्रालयाच्या वेतन अहवालातून समोर आली आहे.

[amazon_link asins=’8179922324,8129140195′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f4e7b50-a82f-11e8-ba60-3373c122a7fc’]

सप्टेंबर २०१७ ते जून २०१८ या दहा महिन्यात २३ लाख ४७ हजार कामगार कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनेचा लाभापासून वंचित झाले आहेत. तर कामगार भविष्य निर्वाह निधी महामंडळात याच दहा महिन्यात ४७.१३ लाख नवे खातेदार वाढले आहेत, अशी माहिती सांख्यिकी मंत्रालयाच्या वेतन अहवालात पुढे आली आहे. यावरून देशातील रोजगारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असलेली माहिती व संबंधित विभागाकडे उपलब्ध माहिती यामध्ये तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी महामंडळ, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या तीन संस्थाच्या लाभाथ्र्यांच्या आकडेवारीवरून जून २०१८ साठी वेतन अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये संघटीत क्षेत्रातील रोजगाराच्या आकडेवारीतील तफावत दिसून येत आहे. या अहवालातून फक्त प्राथमिक रोजगाराची माहिती कळत असून लाभाथ्र्यांची माहिती एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसत असल्यामुळे ही तफावत दिसून येते.