Kangana Ranaut : कंगऩाने मुलाखतीत केला खुलासा, म्हणाली – ‘…म्हणून मी अजूनही सिंगल’ (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिने सिंगल असण्याचे कारण सांगितले आहे. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या कॉमेडीकिंग कपिल शर्मा यांचा द कपिल शर्मा शो मधील हा व्हिडीओ आहे. कंगना 2014 मध्ये क्वीन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा’ शोमध्ये आली होती, तेंव्हाचा हा व्हिडीओ आहे.

Advt.

कपिलच्या शोचा हा व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत युट्युब काऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत सुरुवातीला एक चाहता कंगनाला तू एवढी सुंदर असूनही सिंगल का आहेस? असा प्रश्न विचारतो. त्याला उत्तर देत कंगना कपिल आणि नवजोत सिंग सिद्धूकडे यांच्याकडे पाहून म्हणते, याच पण लग्न झालं आहे आणि त्यांचपण लग्न झाल आहे, सगळ्यांच लग्न झाल आहे. तर कंगनाचा चाहता तिथेच थांबत नाही आणि म्हणतो, मी सिंगल आहे. चाहत्याच उत्तर ऐकताच कंगना हसू लागते. दरम्यान क्वीनमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे कंगना घरा घरात पोहोचली. या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री लीसा हेडन देखील मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, कंगना आता अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्यातील एक म्हणजे थलायवी. त्यानंतर कंगना तेजस आणि धाकड या दोन चित्रपटात दिसणार आहे.