संगीतकार ए.आर. रहमानवर Tax चोरीचा आरोप, मद्रास उच्च न्यायालयाने दिली नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्कर विजेता संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान आयकर विभागाच्या निशाण्यावर असून तो अडचणीत सापडला आहे. आयकर विभागाने त्याच्यावर आरोप केला आहे की, कर भरणे टाळण्यासाठी संगीतकाराने आपलं फाउंडेशन ए आर रहमान फाउंडेशनची मदत घेतली आहे. हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात गेले आहे. यानंतर या प्रकरणात प्राप्तिकराचे अपील लक्षात घेता संगीतकारांविरूद्ध नोटीसही बजावण्यात आली आहे. हे प्रकरण खूप जुनं आहे.

सहसा वादापासून दूर राहणारा ए.आर. रहमान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. न्यायमूर्ती टीएस शिवगनाम आणि न्यायमूर्ती व्ही. भवानी सुब्रोयन यांच्या खंडपीठाने ए.आर. रहमानच्या विरोधात नोटीस बजावली आहे. प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील टीआर सेंथिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहमानला सन 2011-12 मध्ये कराराप्रमाणे ट्यून बनवण्याचे 3.47 कोटी रुपये मिळाले होते. हा करार यूके बेस्ड कंपनी लिब्रा मोबाईल द्वारे करण्यात आला होता. करारानुसार रहमान यांना कंपनीसाठी नवीन धून बनवून द्याव्या लागल्या. कंपनीशी रहमानचा हा करार 3 वर्षांसाठी होता.

विभागाच्या म्हणण्यानुसार, ए आर रहमाननी कंपनीबरोबर केलेल्या करारामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की या कामासाठी त्यांना मिळणारे पैसे वैयक्तिकरित्या दिले जाऊ नयेत, ते ए.आर. रहमान फाउंडेशनला द्यावे, ज्यांचे संचालन संगीत दिग्दर्शक स्वत: चालवतात. आता यावर ए.आर. रहमान कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, परंतु प्राप्तिकर विभागाने त्याच्यावरील पेंच कठोर केले आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यावरून दिली होती प्रतिक्रिया
स्वत: ला चर्चेपासून दूर ठेवणारा ए.आर. रहमान आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत क्वचितच वादात सापडला आहे. काही काळापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीचा मुद्दा आणि चित्रपट माफिया यावरही त्याने आपली प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिसादाच्या निमित्ताने त्याने तो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत नाही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीकडे जास्त लक्ष देत नाही असा लोकांमध्ये पसरलेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला.