‘अमिताभ-रेखा’सह बॉलिवूडमधील ‘या’ 5 प्रसिद्ध लव स्टोरीज, ज्या खूप गाजल्या परंतु कधीच पूर्ण झाल्या नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत ज्या खूप गाजल्या आहेत. परंतु त्या कधीच पूर्ण होऊ शकल्या नाहीत. याच लव्ह स्टोरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) अमिताभ आणि रेखा – बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. एवढी उलटूनही त्यांचे काही किस्से समोर येताना दिसत असतात. 1981 मध्ये यश चोपडा यांनी अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत सिलसिला हा सिनेमा केला. यानंतर हे दोन स्टार कधीच एकत्र दिसले नाहीत. त्यांचा फोटोही कधी समोर आला नाही.

2) अक्षय आणि शिल्पा – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचंही अफेअर खूप गाजलं आहे. दोघांच्या लग्नाबद्दलही बोललं जात होतं. परंतु अचानक अक्षय आणि ट्विकंल यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या. यानंतर अक्षय आणि शिल्पाच्या नात्याला फुलस्टॉप लागला. खुद्द ट्विंकलनं याबाबत खुलासा केला आहे.

3) सलमान आणि ऐश्वर्या – बॉलिवूड स्टार सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी चाहत्यांना खूप आवडायची. सलमान खूपच पजेसिव होता जे ऐश्वर्याला बंधनासारखं वाटू लागलं. त्यांच्यात खूप वाद झाले ज्याचं रुपांतर ब्रेकअपमध्ये झालं.

4) अभिषेक आणि करिश्मा – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचंही नातं साऱ्यांना माहिती आहे. अभिषेकनं अंगठी देऊन तिला प्रपोज केलं होतं. दोघांचं लग्न होणार होतं परंतु हे नातं जास्त काही टिकलं नाही. करिश्माची आई बबितामुळं नातं तुटलं.

5) करीना आणि शाहिद – करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी 2004 साली फिदा या सिनेमात काम केलं. यावेळी झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. परंतु अचानक दोघं वेगळे झाले.