Coronavirus : देशाभरात 957 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, आकडा 14000 पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात मागील 24 तासात 957 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 14 हजार 792 इतकी झाली आहे. मागील 24 तासात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत कोरनाची लागण होऊन 488 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी हि माहिती दिली. देशभरात 2015 रुगण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील 28 दिवसांमध्ये देशभरातल्या 23 राज्यांमधील 47 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे. तर देशातले 45 जिल्हे असे आहेत. ज्यामध्ये मागील 14 दिवसांमध्ये नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर उपाय योजनाण्यासाठी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.