शरीरातील रक्त वाढवण्यासाठी करा ‘हे’ ८ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे आपल्याला अशक्तपणा, दम, सतत थकवा अशा आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच रक्ताच्या कमतरतेमुळे आपण विविध आजारांना बळी पडतो. त्यामुळे आपण आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल.

१) चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.

२) दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

३) तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.

४) दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.

५) मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.

६) टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

७) सफरचंदाच्या ज्युसमध्ये बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकावा. कारण या मिश्रणात लोहचे प्रमाण जास्त असते. किंवा नियमित बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

८) रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा.