
IND VS AUS | भारताविरुद्धच्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूंचे झाले पुनरागमन
पोलीसनामा ऑनलाईन : IND VS AUS | ऑस्ट्रेलियाने नुकताच भारताविरुद्धच्या आगामी 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 17 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श यांचे पुनरागमन झाले आहे. वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी हि मालिका महत्वपूर्ण ठरणार आहे. या संघात ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श यांच्याबरोबर डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर, एश्टर एगर, पॅट कमिन्स यांनादेखील वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. (IND VS AUS)
डेव्हिड वॉर्नर, एश्टर एगर, पॅट कमिन्स हे तिन्ही खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतले होते. दुखापतीमुळे वॉर्नर कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे तर एश्टन एगरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कसोटी संघातून रिलीज कऱण्यात आले होते. दिल्ली कसोटी संपल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स घरगुती कारणामुळे मायदेशी परतला आहे. (IND VS AUS)
मिशेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघे दुखापतीमुळे संघाबाहेर होते. दोघांवरही काही दिवसांपूर्वी सर्जरी झाली होती. आता ते एकदम फिट झाले असून ते या मालिकेतून पुनरागमन करणार आहेत. या मालिकेचा पहिला सामना 17 मार्चला मुंबईत होणार आहे तर दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणम व तिसरा सामना 22 मार्चला चेन्नईत होणार आहे. वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही एकदिवसीय मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, ट्रेव्हिस हेड, जोश इंगलिस,
मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाए रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्ग, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि एडम झाम्पा.
Web Title :- IND VS AUS | ind vs aus odi glenn maxwell mitchell marsh returned in australia squad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Rohit Pawar | ‘शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, लागलात तर तुमचं…’, रोहित पवारांचा सूचक इशारा