Ind Vs Aus Test | उर्वरित दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे संघात पुनरागमन

पोलीसनामा ऑनलाईन : Ind Vs Aus Test | बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील उर्वरित 2 कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. याआधी फक्त सुरुवातीच्या 2 कसोटी सामन्यांसाठी आधी संघ जाहीर करण्यात आला होता. या मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने क्रमशः इंदूर आणि अहमदाबाद या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात जास्त काही बदल करण्यात आलेला नाही.

या संघामध्ये फक्त एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. याआधी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले होते मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. यानंतर त्याला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी दुसऱ्या कसोटीतून रिलीज करण्यात आले होते. आता त्याला पुन्हा संघात घेण्यात आले आहे. उनाडकटचा केवळ कसोटीच नव्हे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतही संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (क), केएल राहुल, एस गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर),
इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आर. जडेजा, मोहम्मद शमी,
मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Web Title :- Ind Vs Aus Test | bcci announces team india for remaining two test series against australia jaydev unadkat back in team ind vs aus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | अलिशान चारचाकीसाठी विवाहितेचा खून, चिखली परिसरातील घटना; सासरच्या मंडळींवर FIR