IND vs BAN 2nd ODI | भारतीय संघाला मोठा धक्का; रोहित शर्माला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन : IND vs BAN 2nd ODI | आज भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. रोहितच्या दुखापतीनंतर त्याला एक्स-रेसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

https://twitter.com/AdnanAn71861809/status/1600372708017000448

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने डावाच्या दुसऱ्या षटकात अनामूल हकला LBW आऊट करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अनामूल हक अवघ्या 11 धावांवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याने माजी कर्णधार विराट कोहलीकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

आतापर्यंत भारताने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने 3, मोहम्मद सिराजने
2 तर उमरान मलिकने 1 विकेट घेतली आहे. मोहमददुल्ला आणि मेहंदी हसन मिर्झा हे अनुक्रमे 46 आणि 52
धावांवर खेळत आहेत. बांगलादेशच्या आतापर्यंत 6 विकेट पडल्या आहेत.

Web Title :- IND vs BAN 2nd ODI | rohit sharma has been admitted to the hospital after injuring his hand while fielding in ind vs ban 2nd odi match

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Border Issue | पुण्यात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी अनोखी पद्धत; इडली, सांबार आणि मसाला डोश्यावर…

ICC Player of the Month | आयसीसीकडून नोव्हेंबरचे मानांकन जाहीर; ‘या’ 3 खेळाडूंत भारतीयाचा नाही समावेश

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

Pune Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक