Maharashtra Karnataka Border Issue | पुण्यात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी अनोखी पद्धत; इडली, सांबार आणि मसाला डोश्यावर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Issue) पुन्हा उफाळला आहे. त्यात काल (६ डिसेंबर) ‘कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्र नोंदणीच्या ट्रकची बेळगावात हिगेबागवाडी येथील टोल नाक्यावर तोडफोड केली. त्यामुळे या वादाचा (Maharashtra Karnatak Seemawad) फटका दोन्ही राज्यांतील प्रवाशांना तर बसला होताच, पण आता या वादाची झळ इडली, सांबार आणि मसाला डोश्याला बसणार आहे. (Maharashtra Karnataka Border Issue)

या संपूर्ण प्रकरणाचा निषेध म्हणून इडली, सांबार आणि मसाला डोसा या दक्षिणात्य पदार्थांवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितली. विविध क्षेत्रातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी ओळखला जाणाऱ्या वाडेश्वर कट्ट्यावर त्यांनी आज ही घोषणा केली. अंकुश काकडे यांच्या पुढाकाराने हा कट्टा भरवला जातो.

अंकुश काकडे म्हणाले, ‘कर्नाटकातील अनेक नागरिक महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करतात.
महाराष्ट्रातील नागरिकांच्या जिवावर ते मोठे झाले. मात्र, कर्नाटक सरकार मराठी माणसाचा किती द्वेष करते,
हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही हा बहिष्कार टाकला आहे.
‘ मात्र, हा बहिष्कार फक्त दक्षिणात्य पदार्थांवर असून, कर्नाटकातील हॉटेल व्यावसायिक,
व्यापाऱ्यांना किंवा नागरिकांना त्रास देण्याचा हेतू यामागे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील वाद संपत नाही, तोपर्यंत हा बहिष्कार सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title :- Maharashtra Karnataka Border Issue | boycott of idli sambhar masala dosa karnataka govt protest ncp unique movement in pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना