IND vs ENG : हार्दिकनं हात जोडून मागितली सर्वाची माफी, जाणून घ्या नेमकं काय घडल? (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावाचे आव्हान दिले होते. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली होती. भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या पहिल्याच षटकात जेसन रॉयला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं होते. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला देखील भुवनेश्वरने पायचीत करत भारताला दुसर यश मिळवून दिले. पण भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या ते इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या विकेटकडे. दरम्यान शिखर धवनन स्टोक्सचा झेल टिपताच हार्दिक पंड्याने मैदानात खाली बसून सुटलेल्या झेलबाबत माफी मागितली अन् स्टोक्सची विकेट गेल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.

https://twitter.com/sayaboina_jash/status/1376156532866383872

सामन्यात बेन स्टोक्सला स्वस्तात बाद करण्याची संधी देखील भारतीय संघाला मिळाली होती. पण हार्दिक पंड्याकडून स्टोक्सचा झेल सुटला आणि सर्वांना धक्का बसला. स्टोक्सचा झेल सुटल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. हार्दिककडून सहसा झेल सुटत नाही. त्यात अगदी सोपा झेल सुटल्याने काहीक्षण संघाचा सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना विश्वासच बसला नाही. स्वत: हार्दिक देखील खूप निराश झालेला दिसून आला. बेन स्टोक्ससारख्या घातक फलंदाजाचा झेल सुटल्याची सल हार्दिकच्या मनाला छळत होती. पुढे टी नटराजनच्या फुलटॉस चेंडूवर स्टोक्सने फटका लगावण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी शिखर धवनने कोणतीही चूक न करता झेल टीपला अन् स्टोक्सचा विकेट घेतला. भारतीय संघाला मोठ यश मिळाले होते. धवननं स्टोक्सचा झेल टिपताच हार्दिकने सुटकेचा नि:श्वास सोडला.