IND Vs NZ 3rd ODI | शुभमन गिलने केला हा मोठा विक्रम; अनेक दिग्गजांना टाकले मागे

पोलीसनामा ऑनलाइन : IND Vs NZ 3rd ODI | न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी भारताला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. भारताला 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावा करता आल्या. भारताला या सामन्यात पूर्ण 50 षटकेपण खेळता आले नाहीत. या सामन्यात भारताचे ओपनर कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी संघाला संथ सुरुवात करून दिली. या दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. शुभमन गिलने या सामन्यात 22 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या. त्याच्या या छोट्याशा खेळीमुळे त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (IND Vs NZ 3rd ODI)

काय आहे तो विक्रम?

गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वात वेगवान 500 धावा केल्या. त्याने फक्त 11 डावात ही कामगिरी केली. याबाबतीत त्याने राहुल द्रविड आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना मागे टाकले. राहुल द्रविड आणि सिद्धू यांनी ओपनिंग करताना 12 डावात 500 धावा केल्या होत्या. केएल राहुल आणि शिखर धवन यांनी 13-13 डावात, तर सचिन, सेहवाग यांनी 14-14 डावात हा टप्पा पार केला होता.

गिलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक केलं होतं. त्याने 65 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती,
तर पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42 चेंडूत 45 धावा केल्या होत्या.
मात्र, आजच्या निर्णायक सामन्यात शुभमन गिलला मोठी खेळी करण्यात अपयश आले.
श्रेयस अय्यरने 49, तर वॉशिंग्टन सुंदरने 51 धावा केल्या.
या दोघांव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

Web Title :- IND Vs NZ 3rd ODI | ind vs nz 3rd odi shubman gill flopped but broke the records of sachin sehwag and dravid became indias number 1 batsman in this case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | येरवडा मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हलविणार

CM Eknath Shinde | उदयनराजे भोसलेंच्या अनुपस्थितीवर थेट बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; म्हणाले…

Bigg Boss Marathi | अपूर्वा नेमळेकरच्या खेळाबद्दल व्यक्त झाल्या अण्णा नाईकांच्या पत्नी; म्हणाल्या – “मी बिग बॉस सतत बघत नाही यामुळे……..”