Bigg Boss Marathi | अपूर्वा नेमळेकरच्या खेळाबद्दल व्यक्त झाल्या अण्णा नाईकांच्या पत्नी; म्हणाल्या – “मी बिग बॉस सतत बघत नाही यामुळे……..”

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Bigg Boss Marathi | छोट्या पडद्यावरील शो बिग बॉस सध्या सर्वांचेच मनोरंजन करताना दिसत आहे. यातील स्पर्धकही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास कोणतीही कसर सोडत नाहीत. घरात पहिल्याच दिवसापासून भांडण, गॉसिप, राडे पाहायला मिळत आहेत. त्यातच पहिल्या दिवसापासून या शोची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती, तर यंदा बिग बॉसचे पर्व चर्चेत असण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. (Bigg Boss Marathi)

 

अपूर्वाने ‘रात्री स खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचली होती. एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणूनदेखील तिची ओळख आहे. आता बिग बॉसच्या घरात जाताच तिने तिची छाप पाडायला सुरुवात केली. घरामध्ये टीममध्ये काम करणे, आरडाओरड करणे एवढेच नाही तर लीडरशिपच्या भूमिकेतदेखील अपूर्वाला कित्येकदा पाहिले गेले, तर तिच्या या गेममुळे अनेक जण तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काहींनी तिच्यावर टीकादेखील केले आहे. (Bigg Boss Marathi)

नुकताच रात्री स खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईक यांची पत्नी इंदुमती नाईक यांना अपूर्वा नेमळेकर यांच्या खेळाबद्दल विचारण्यात आले होते.
इंदुमती नाईक हे पात्र अभिनेत्री शकुंतला नारे यांनी साकारली होती. एका मुलाखतीत त्यांना अपूर्वाच्या खेळाबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.
यावर बोलताना शकुंतला नारे म्हणाल्या “मी यावर बोलू शकत नाही. कारण मी माझ्या व्यस्त कामातून बिग बॉस सतत पाहत नाही.
माझं शूट नसतं तेव्हा मी दोन-तीन दिवस बिग बॉस पाहते.
असे मध्येच पाहून कोणावरही आरोप प्रत्यारोप करणे हे मला चुकीचे वाटते.
उगाच मी काहीतरी पाहिलं आणि काहीतरी बोललं असं होऊ शकतं त्यामुळे मी यावर काहीही बोलू शकत नाही”.

 

Web Title :- Bigg Boss Marathi | bigg boss marathi season 4 shakuntala nare aka maai talk about apruva nemlekar bb4 game

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर