IND vs NZ 3rd ODI | विराट कोहली आपल्या नावावर करू शकतो ‘हा’ विक्रम; जाणून घ्या काय आहे तो विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन : IND vs NZ 3rd ODI | सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील 2 सामने झाले असून हे दोन्ही सामने भारताने जिकंले आहेत. आज या मालिकेतील तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आज दुपारी 1:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे. आजच्या सामन्यात जर विराट कोहलीने शतक झळकावले, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा पूर्ण करेल. याबरोबर तो हा टप्पा पार करणारा 6 वा खेळाडू बनेल. (IND vs NZ 3rd ODI)

आजचा सामना भारताने जिंकला तर भारत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देईल. पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताने हि मालिका आधीच खिशात घातली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जर हीच लय कायम राहिली तर टीम इंडिया न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकेल. याअगोदर श्रीलंके विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला होता.

कोहली 25 हजार धावांपासून एक शतक दूर

विराट कोहलीने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीमध्ये 489 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 53.77 सरासरीने 24900 धावा केल्या आहेत. यामध्ये 129 अर्धशतके आणि 74 शतकांचा समावेश आहे. जर कोहलीने आजच्या सामन्यात शतक केले तर तो आंतरराष्ट्रीय 25000 धावा पूर्ण करणारा जगातील 6 वा आणि भारताचा दुसरा फलंदाज ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

1.सचिन तेंडुलकर – 34357
2.कुमार संगकारा – 28016
3.रिकी पाँटिंग – 27483
4.महेला जयवर्धने – 25957
5.जॅक कॅलिस – 25534
6.विराट कोहली – 24900

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीची जबरदस्त कामगिरी

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहलीने खोऱ्याने धावा केल्या होत्या.
तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावली होती.
तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

Web Title :- IND vs NZ 3rd ODI | ind vs nz 3rd odi virat kohli needs just one century to complete 25000 international runs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?