IND Vs SA 2nd T20 | गुवाहाटीच्या सामन्यात आपल्या वादळी खेळीने सूर्याने केला ‘हा’ विक्रम

गुवाहाटी : वृत्तसंस्था – IND Vs SA 2nd T20 | सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या मागच्या काही सामान्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारने गुवाहाटीत (Guvahati) पार पडलेल्या दुसऱ्या T20 (IND Vs SA 2nd T20) सामन्यात मोठी कामगिरी पार पाडली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी खेळी करत 18 बॉलमध्ये अर्धशतक (Half Century) पूर्ण केली. भारताकडून टी20 क्रिकेटमधलं (Cricket News) हे तिसरं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. सूर्यकुमारचे आपल्या करिअरमधील हे टी-20 मधील नववे अर्धशतक आहे. याआधी युवराज सिंगनं (Yuvraj Singh) 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 बॉलमध्ये अर्धशतक केले होते. त्यानंतर लोकेश राहुलनं (Lokesh Rahul) 18 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.

सूर्यकुमारच्या T20 मध्ये 1 हजार धावा पूर्ण
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये (IND Vs SA 2nd T20) सर्वात कमी चेंडूत 1000 धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमारने 573 चेंडूत 1000 धावा केल्या आहेत. जे सर्वात कमी चेंडूत 1000 धावा आहे. 1000 धावा पूर्ण केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलनंतर (KL Rahul) हा टप्पा गाठणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

टीम इंडियाने उभारला धावांचा डोंगर
या सामन्यात भारतीय फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आले. रोहित शर्मानं (Rohit Sharma)
लोकेश राहुलसह (Lokesh Rahul) भारतीय डावाला दमदार सुरुवात करुन दिली.
रोहितनं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या.
रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं.
राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या.
यानंतर हे दोघे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी सगळी सूत्रे आपल्या हाती घेत
टीम इंडियाला 200 चा पल्ला गाठून दिला.

Web Title :- IND Vs SA 2nd T20 | suryakumar yadav achieves 2 huge milestones with blazing half century during 2nd india vs south africa t20i cricket news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Cricket News | वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या ‘या’ कॅप्टनला झाली मोठी दुखापत

Pune Crime | ‘हम यहा के भाई है’ ! धनकवडी-चव्हाणनगर परिसरात दहशत पसरविण्यासाठी तरुणावर तिघा गुंडाकडून कोयत्याने वार घावामुळे तुटले बोट